महिला सदस्य आक्रमक होताच गुंडाळली सभा

By admin | Published: January 12, 2016 12:23 AM2016-01-12T00:23:26+5:302016-01-12T00:23:26+5:30

जिल्हा परिषदेच्या महिला सदस्याला कुठलीही तरतूद नसलेल्या लेखाशिर्षाखालील निधी कागदोपत्री देऊन त्यांची बोळवण केल्याचे उघड झाले आहे.

The women's member was aggressive as soon as the gang attendance meeting | महिला सदस्य आक्रमक होताच गुंडाळली सभा

महिला सदस्य आक्रमक होताच गुंडाळली सभा

Next

निधी वाटपात दुजाभाव : सभागृहात अर्चना मुरूमकरांचा आवाज
अमरावती : जिल्हा परिषदेच्या महिला सदस्याला कुठलीही तरतूद नसलेल्या लेखाशिर्षाखालील निधी कागदोपत्री देऊन त्यांची बोळवण केल्याचे उघड झाले आहे. या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या सभेत अध्यक्षांना जाब विचारणाऱ्या सदस्य अर्चना मुरूमकर यांच्या आक्रमक पवित्र्याने अंतिम टप्प्यात असलेली सभा गुंडाळण्यात आली. मुरूमकर यांच्या आक्रमतेचे कुठलेही उत्तर प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडे नसल्याने सभा गुंडाळण्यात आल्याचा आरोप अन्य सदस्यांनी यावेळी केला.
जि.प. मध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मात्र सदस्यांना शासन, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा निधी यामधून प्रत्येक सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी जि. प.मार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती अर्चना मुरूमकर यांना सत्ताधाऱ्यांनी विकास निधीचे वाटप करताना त्यांना दहा लाख रूपयांचा निधी दिल्याचे पत्र मिळाले. त्यापैकी एकही काम घेतले नाही.
याशिवाय ३०-५४ या रस्ते विकास निधीतून निधीही देण्यात आला नाही. तर मिनी म्हाडा यामधून निधी देण्यात आला. विशेष म्हणजे या हेडवर एक रूपयांची तरतूद नसताना माझ्यावर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करीत सभेत अर्चना मुरूमकर यांनी सभेच्या शेवटच्या टप्प्यात आक्रमक भूमिका मांडली.

Web Title: The women's member was aggressive as soon as the gang attendance meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.