२७ ठिकाणी महिला स्वच्छतागृहे

By admin | Published: June 27, 2017 12:10 AM2017-06-27T00:10:48+5:302017-06-27T00:10:48+5:30

अंबानगरतील महिलांसह शहरात विविध कामांनी येणाऱ्या महिलांची कुुचंबणा थांबविण्यासाठी महापालिका २७ ठिकाणी महिला प्रसाधनगृहांचे बांधकाम करणार आहे.

Women's toiletries in 27 places | २७ ठिकाणी महिला स्वच्छतागृहे

२७ ठिकाणी महिला स्वच्छतागृहे

Next

जागा निश्चित : टप्प्याटप्प्याने होणार बांधकाम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानगरतील महिलांसह शहरात विविध कामांनी येणाऱ्या महिलांची कुुचंबणा थांबविण्यासाठी महापालिका २७ ठिकाणी महिला प्रसाधनगृहांचे बांधकाम करणार आहे. ‘फायबर टॉयलेट’चा प्रयोग अयशस्वी झाल्याने प्रशासन यानवीन प्रयोगासाठी सावध पावले उचलत आहे. शहरातील विविध भागात महिला स्वच्छतागृहांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या असून त्यांचे बांधकाम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.
तत्कालीन स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या पुढाकाराने या योजनेला मूर्तरूप देण्यात आले होते. महिला प्रसाधनगृहासाठी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. याशिवाय १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीमधून महिला स्वच्छतागृहावर खर्च केला जाईल. महिला प्रसाधनगृहाची देखभाल व दुरूस्तीची कामे ‘पे अ‍ॅन्ड यूज’ च्या धर्तीवर ३० वर्षांकरिता करण्यात येणार आहेत. यासाठी सुमन इंटरनॅशनल व सुदर्शन समाज बहुउद्देशीय विकास संस्था नागपूरशी करारनामा करण्यात आला आहे. २७ पैकी पहिल्या टप्प्यात पाच व दुसऱ्या टप्प्यात आणखी ५ प्रसाधनगृहे बांधली जातील. उच्च न्यायालयाच्या निर्देशाने महिला प्रसाधनगृहांचे बांधकाम केले जाणार आहे. नवसारी बसस्टॉप, गाडगेबाबा समाधी मंदिराजवळ, पीडीएमसीजवळ, शेगांव चौक, कठोरा नाका (मजीप्रा पाण्याच्या टाकीजवळ), मास्टर मेडीकल लगत, सबनिस फोटो स्टुडिओलगत, शवविच्छेदनगृहाजवळ, शिवटेकडी रोडनजीक, चित्रा चौक, इतवारा बाजार मार्केटमध्ये, प्रभात चौक (जुन्या मुतारीजवळ) प्रभात टॉकीजमागे, नगर वाचनालयाजवळ राजकमल, चापोरकर कॉम्प्लेक्स मागे नमुना, राजापेठ जॅक अ‍ॅन्ड जिल शाळेजवळ, राजापेठ सियाराम शोरूमलगत, पूज्य बाबरी दरबारालगत, शहर कोतवालीसमोर, मनपा मुख्यालय, यशोदानगर, शुक्रवार बाजार, दक्षिण प्रभागीय कार्यालयाजवळ, दर्ग्याजवळ जुनीवस्ती बडनेरा, नवाथेनगर, दस्तुरनगर (गोरक्षणसमोर), सराफा बाजारामध्ये (जवाहर गेट) येथे महिला स्वच्छतागृह बांधले जाणार आहे.

महिला प्रसाधनगृहांसाठी शहरात २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने स्वच्छतागृहांची उभारणी केली जाईल.
-सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा

Web Title: Women's toiletries in 27 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.