कौतुकास्पद! अमरावती जिल्ह्यातील जळका जगताप येथे युवकाकडून गावाला स्वखर्चाने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:37 AM2018-04-03T11:37:33+5:302018-04-03T11:38:05+5:30
चांदूर रेल्वे तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावरील जळका जगताप येथे तीन वर्षांपासून पाणी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी गावातीलच सधन शेतकरी युवकाने स्वत:च्या शेतातील पाणी टँकरने विनामूल्य उपलब्ध केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: चांदूर रेल्वे तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावरील जळका जगताप येथे तीन वर्षांपासून पाणी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी गावातीलच सधन शेतकरी युवकाने स्वत:च्या शेतातील पाणी टँकरने विनामूल्य उपलब्ध केले आहे.
जळका जगताप येथील शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कौस्तुभ खेरडे यांनी २८ एकरांतील संत्राबागेची पर्वा न करता स्वखर्चाने टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्याचा निर्धार केला. रविवारी पांडुरंग महाराज मंदिरात पूजन करून शिवसेनेचे संजय बंड, राजू निंबर्ते, उमेश घुरडे, दिवाकर खेरडे, भरत खेरडे यांच्या हस्ते टँकरचे लोकार्पण झाले. दररोज २५ हजार लिटर पाणी ग्रामस्थांना उपलब्ध केले जात आहे.