बीएलओची कामे करावीच लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:05 AM2017-11-26T00:05:44+5:302017-11-26T00:06:23+5:30

आरपी अ‍ॅक्ट (लोकप्रतिनिधित्व अधिनियम) नुसार राष्ट्रीय मतदार यादीचे शुद्धीकरण कार्यक्रम हा राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असल्याने शिक्षक स्थानिक रहिवासी असल्याने .....

The work of the BLO will have to be done | बीएलओची कामे करावीच लागतील

बीएलओची कामे करावीच लागतील

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी बजावले : राष्ट्रीय कर्तव्यामध्ये कसूर खपविणार नाही

ऑनलाईन लोकमत
अमरावती : आरपी अ‍ॅक्ट (लोकप्रतिनिधित्व अधिनियम) नुसार राष्ट्रीय मतदार यादीचे शुद्धीकरण कार्यक्रम हा राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असल्याने शिक्षक स्थानिक रहिवासी असल्याने सकाळी व सायंकाळी मतदारांच्या घरभेटीची कामे होऊ शकतात. कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रीय कर्तव्यात मुलाहिजा खपविला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी १५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीचा नमुना १ ते ८ संकलित करणे गरजेचे आहे. दरम्यान, बीएलओंनी राष्ट्रीय कामास विरोध दर्शवून त्यासंबंधी अर्ज दिल्याने मेळघाट मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकाºयांनी ३२ शिक्षकांविरोधात चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
जिल्हाधिकारी निर्णयावर ठाम
अमरावती :अद्याप या तक्रारीवर गुन्हा दाखल झालेला नाही. लगेच दुसºया दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय कृती समितीद्वारा जिल्हाधिकांºयासह विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन बीएलओचे काम अशैक्षणिक असल्यामुळे शिक्षकांना या प्रक्रियेतून वगळण्यात यावे. किंबहुना या कामांवर शिक्षकांचा बहिष्कार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख घटक असलेल्या शिक्षकांनीच बंड पुकारल्यामुळे सध्या तरी कार्यक्रमाची प्रक्रिया थंडावली आहे.
शिक्षक संघटनांच्या निवेदनानुसार, आरटीई अ‍ॅक्ट २००९ नुसार शिक्षकांना दैनंदिन कामकाजात शैक्षणिक कामे करणे अनुज्ञेय आहेत. तरीदेखील शिक्षकांची ‘बीएलओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा आरटीई कायद्याचा भंग आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची बीएलओ म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे निदर्शनात आणून देण्यात आले आहे. मात्र, जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी ठाम भूमिका घेतल्याने मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत राबविला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The work of the BLO will have to be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.