मनसेने रोखले काम, आधी पर्यायी व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:14 AM2021-01-20T04:14:50+5:302021-01-20T04:14:50+5:30
बडनेरा : चौपदरीकरणाच्या कामात जुन्या वस्तीतील काही घरे पाडण्यास मनसेने विरोध दर्शविला आहे. काम सुरू होण्याआधी पर्यायी व्यवस्था करा, ...
बडनेरा : चौपदरीकरणाच्या कामात जुन्या वस्तीतील काही घरे पाडण्यास मनसेने विरोध दर्शविला आहे. काम सुरू होण्याआधी पर्यायी व्यवस्था करा, मगच घरांवर हातोडा चालवा, असा इशारा देत कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले.
जुन्या वस्तीच्या सावता मैदानालगत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. संतोषीमाता मंदिरालगतची घरे रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्याचे काम १९ जानेवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास होणार होते. जेसीबीच्या साहाय्याने घरे पाडण्यापूर्वीच मनसेचे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, शहराध्यक्ष गौरव बांते, विवेक पवार, राजू देवडा, राजेश ढोरे, कमलेश कडव, सतीश साबळे, अभिषेक लोखंडे या सर्वांनी उपस्थित होत काम थांबविले. आमचा विकासाला विरोध नाही, आधी गोरगरिबांना पर्यायी व्यवस्था करून द्या, अशी मागणी असल्याचे स्पष्ट केले. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तदेखील होता.