सापन नदीवरील ‘त्या’ पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:00 AM2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:02+5:30

परतवाडा चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेअंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा रस्ता आणि पूल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जांडू कन्ट्रक्शन कंपनीतर्फे हे काम सुरू आहे.

Work on the 'that' bridge over the Sapan River begins | सापन नदीवरील ‘त्या’ पुलाचे काम सुरू

सापन नदीवरील ‘त्या’ पुलाचे काम सुरू

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : धोतरखेडाच्या पुलासह इतरही कामे होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : ऐन लॉकडाऊन'मध्येच परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धोतरखेडानजीकच्या सापन नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. जून महिन्यापर्यंत पुलाचे काम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे चिखलदरासह ७० गावांचा तुटलेला संपर्क सुरळीत होणार आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत काम सुरू करण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरस संदर्भात आदेशाचे पालन करीत हे काम करण्याचे निर्देशही दिले आहेत.
परतवाडा चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेअंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा रस्ता आणि पूल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जांडू कन्ट्रक्शन कंपनीतर्फे हे काम सुरू आहे. सापन नदीवर दोनशे मीटर लांबीच्या पुलाचे काम मागील एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद पडले होते. या पुलाचे काम पावसाळ्या पूर्वी न झाल्यास चिखलदरासह परिसरातील ७० गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची भीती वर्तविली जात होती. त्यासंदर्भात 'लोकमत'ने गत आठवड्यात वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भात कॅम्प मजुरांकडून नियमांचे पालन करीत काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत पुलावरी स्लॅबचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

धारणी चांदूर बाजारातील कामे होणार सुरू
धारणी, चांदूरबाजार, चिखलदरा तालुक्यातील खोगडा येथील अर्धवट व अतिआवश्यक पूल रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहेत. शासनाने महापालिका व नगरपालिका क्षेत्राबाहेरील कामे सुरू करण्याचे आदेश काढल्याने निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी परवानगी देताच इतरही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अचलपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी 'लोकमत'ला दिली.

धोतरखेडा येथील सापन नदीवरील पुलाचे बांधकाम सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करीत सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. इतरही कामे परवानगी मिळताच लवकरच सुरू केले जाणार आहेत.
- चंद्रकांत मेहत्रे, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, अचलपूर

Web Title: Work on the 'that' bridge over the Sapan River begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.