लोणी-आलोडा मार्गाचे काम अर्धवट स्थितीत

By Admin | Published: November 24, 2015 12:25 AM2015-11-24T00:25:20+5:302015-11-24T00:25:20+5:30

लोणी ते आलोडा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे.

The work of the butterfly-Aveda road is in the semi-finals | लोणी-आलोडा मार्गाचे काम अर्धवट स्थितीत

लोणी-आलोडा मार्गाचे काम अर्धवट स्थितीत

googlenewsNext

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा फज्जा : काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे उपोषण
लोणी : लोणी ते आलोडा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे काम गतवर्षी डिसेंबर महिन्यात सुरू केले होते. परंतु ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. पाऊणेआठ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ३ कोटी ५३ लाख १५ हजार रुपये किंमतीचा रस्ता वाऱ्यावर सोडल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. केंद्र सरकारच्या निधीतून बांधकाम होत असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
लोणी आलोडा नांदगाव हा ७ किमी ८०० मीटरचा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात येऊन या रस्त्यासाठी ३ कोटी ५३ लाख १५ हजार रुपये अर्थसहायक मंजूर आहे. सदर रस्त्याचे काम २०१४ च्या डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आले होते. रस्ता तयार करण्याकरिता रुंदीकरणासह रस्त्यावर येणाऱ्या पुलांचे बांधकाम सुरू केले. यासाठी जुना रस्ता काढण्यात आला. सदर रस्त्यावर पावसाळ्यात शेतकरी, विद्याथी तसेच नगारकीांना मोठा त्रज्ञस सहन करावा लागला होता. यावेळी नगारकीांनी ओरड केली असता बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. याबाबत पालकमंत्री, खासदार तसेच आमदारांनासुध्दा नागरिकांनी वेळोवेळी माहिती तसेच तक्रारी दिल्या. परंतु कोणीही दखल घेतली नाही. पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याचे काम सुरूच झाले नाही. मात्र रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकासह नागरिकांना मरणयातना सोसण्याची वेळ आली आहे. अखेर भाजपाचे कार्यकर्ते मनोहर दाभाडे, अरविंद कोकाटे यांनी अखेर लोणी आलोडा रस्त्यावरच शनिवारपासून सुरू करण्यात आले. विद्यार्थीव शेतकरी-शेतमजुरांना मोठा त्रास होत आहे. पुलासह रस्त्याचे अर्धवट बांधकाम डोकेदुखी ठरत आहे. सदर उपोषणाला प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता वि.शा.जवंजाळ यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना निधी आल्यावर तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र लेखी पत्रामध्ये सदर योजनेच्या रस्त्याचे काम ८५ लाख रुपयांचे झाले असून ठेकेदाराला केवळ १६ लाख रुपये अदा करण्यात आल्याचे सांगितले असून उर्वरित ६९ लाख रुपये देयेक प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. गत मे महिन्यापासून काम बंद केल्याचेसुध्दा लेखी पत्र दिले. सदर कामाचा निधी उपलब्ध करण्याकरिता पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध होताच तातडीने काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी प्राप्त झाला नसल्याने या योजनेचा फज्जा उडत आहे, तर नागरिकांना असहय मरणयातना सोसाव्या लागत आहे. यामुळे तातडीने रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे. भाजपाचे आलोडा शाखाप्रमुख मनोहर दाभाडे तसेच संघटक अरविंद कोकाटे यांनी सरकारच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करून घरचा अहेर दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: The work of the butterfly-Aveda road is in the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.