चंडिकापूर स्मशानभूमीची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:24+5:302021-03-25T04:14:24+5:30

अमरावती : भीम ब्रिगेडच्यावतीने दर्यापूर तहसीलदार, बीडीओंना चंडिकापुर स्मशानभूमीची कामे तातडीने करण्याबाबतचे निवेदन सादर केले. अतिक्रमण हटवून निधी खर्च ...

Work on Chandikapur Cemetery | चंडिकापूर स्मशानभूमीची कामे करा

चंडिकापूर स्मशानभूमीची कामे करा

googlenewsNext

अमरावती : भीम ब्रिगेडच्यावतीने दर्यापूर तहसीलदार, बीडीओंना चंडिकापुर स्मशानभूमीची कामे तातडीने करण्याबाबतचे निवेदन सादर केले. अतिक्रमण हटवून निधी खर्च करून विकासकामे करावी, अशी मागणी राजेश वानखडेसह नागरिकांनी केली.

------------

बडनेऱ्यात काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीची बैठक (फोटो घेणे)

अमरावती : बडनेरा नवीवस्ती येथे काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अब्दुल रफीक, अकरम देशमुख, नसीम खान, शहंशाह, रज्जू खान, सुभान नौरंगाबादी आदी उपस्थित होते. यावेळी अनेक युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

------

बडनेरा येथे पाणपोईचे उद्‌घाटन

अमरावती : भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणपोई सुरू करण्यात आली. यावेळी संतोष सहारे, महेंद्र बागडे, कपिल डोंगरे, प्रकाश पहुरकर, रोशन चव्हाण, किशोर इंगोले, प्रकाश दातार, मनोज गजभिये, नीलेश अहिरे, उमेश मेश्राम आदी उपस्थित होते.

-------------

आजपासून शाळाबाह्य मुलांची शोधमाेहीम

अमरावती : शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागातर्फे शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी २५ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली जाणार आहे.

Web Title: Work on Chandikapur Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.