ग्रामपंचायतींचे कामकाज थांबले

By admin | Published: April 18, 2017 12:30 AM2017-04-18T00:30:06+5:302017-04-18T00:30:06+5:30

ग्रामसेवकांना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारण नसतानाही नाहक त्रास दिला जात असल्याने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ....

The work of Gram Panchayats stopped | ग्रामपंचायतींचे कामकाज थांबले

ग्रामपंचायतींचे कामकाज थांबले

Next

सीईओंना निवेदन : ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन
अमरावती : ग्रामसेवकांना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारण नसतानाही नाहक त्रास दिला जात असल्याने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने १७ एप्रिल रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांना निवेदन देऊन मागण्याकडे लक्ष वेधले आहे.
ग्रामसेवक युनियनच्या अन्य मागण्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत पहिल्या व दुसऱ्या कालपध्द पदोन्नतीस पात्र आहेत. मात्र त्यांना अद्यापही पदोन्नती दिली नाही. ते त्वरित लागू करावी, दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुळदे व तसेच भातकुली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माडीवाले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनने अहकार आंदोलन पुकारले आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी युनियनचे विभागीय अध्यक्ष बबनराव कोल्हे, जिल्हाध्यक्ष ओंकार धोटे, सचिव संजय चौधरी, कार्याध्यक्ष पी.एस.काळपांडे, उपाध्यक्ष नंदलाल पतालिया, महिला उपाध्यक्ष पुष्पा भुयार, सहसचिव प्रमोद चारथळ, प्रशांत वानखड व पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामसेवकांचे काही प्रश्न अद्यापही प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. यावर आश्वासन देऊनही अंमलबजावणी मात्र होत नाही. याशिवाय ग्रामसेवकांना वरिष्ठांकडून नाहक त्रास दिला जात असताना त्याच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव असहकार आंदोलन पुकारले आहे.
- ओंकार धोटे, जिल्हाध्यक्ष
ग्रामसेवक युनियन, अमरावती

Web Title: The work of Gram Panchayats stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.