नवीन अग्निशमन केंद्राच्या भिंतीचे काम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:05+5:302021-03-27T04:13:05+5:30
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, प्रशासनावर शिवसेनेचे आरोप अंजनगाव सुर्जी : येथील नगर परिषदेकडून अकोट रोडच्या बाजूला नवीन अग्निशमन केंद्राच्या वाॅल ...
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, प्रशासनावर शिवसेनेचे आरोप
अंजनगाव सुर्जी : येथील नगर परिषदेकडून अकोट रोडच्या बाजूला नवीन अग्निशमन केंद्राच्या वाॅल कंपाउंडचे बांधकाम दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु अनामिक दबावातून हे बांधकाम थांबविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना शहर प्रमुख राजेन्द्र अकोटकर यांच्या नेतृत्वात २४ मार्च रोजी याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांच्या दुर्लक्षामुळे पालिकेच्या या अग्निशमन केंद्रासमोर खासगी वाहने व अतिक्रमण वाढले आहे.
सदर बांधकाम लवकरच पूर्ण करा. अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे. तसेच त्या जागेत शिवसेना कार्यालय तसेच शिवसेना नगर झोपडपट्टी उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी शिवसेना कार्यालय उभारुन त्याचे उदघाटन नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी गजानन विजेकर, शुभम कहार, अभिजित भावे, सुरेंद्र हाडोळे, शरद फिसके, राहुल ताळे, चेतन रावळे, दिनेश बोडखे, राजू कतोरे, सुनील गौर, दुर्गेश महातो, नसीम बेघ, सुनील घोडे, अभिजित ढेमंरे, संतोष चरडे, गौरव कतोरे, मनीष जैस्वाल आदी उपस्थित होते.
-------------