शासकीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:44 AM2019-09-06T01:44:53+5:302019-09-06T01:45:52+5:30
शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करून सर्व शासकीय कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून प्रशासकीय कामकाज केले.
शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करून सर्व शासकीय कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, लिपिक व लेखा लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम, समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती, बालसंगोपन रजा लागू कराव्यात, पदोन्नती व सरळ सेवा यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करावी व इतर मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. ९ सप्टेंबरला एकदिवसीय लाक्षणिक संपाद्वारे शासनाला इशारा दिला जाणार आहे, तर ११ सप्टेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.