आठवड्यातील पाच दिवसच शासकीय कार्यालयात कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:44+5:302021-08-20T04:17:44+5:30
अमरावती : राज्य शासनाच्या २९ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज आठवड्यातील पाच दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय ...
अमरावती : राज्य शासनाच्या २९ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज आठवड्यातील पाच दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये सोमवार ते शुक्रवारी शासकीय कामकाज सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवारी शासकीय कार्यालयांना सुटी राहणार आहे. कामकाजच्या दिवशी सर्व कार्यालयांची वेळ ४५ मिनिट वाढविण्यात आली आहे. यानुसार सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता कार्यालय उघडतील आणि सांयकाळी ६.१५ वाजता बंद होतील. याशिवाय शासकीय कार्यालयाचे कामकाज सकाळी ९.४५ ते सांयकाळी ६.१५ पर्यत होईल. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे कामकाज सकाळी ९.३० ते सांयकाळी ६.३० वाजेपर्यंत राहणार आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सर्व प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना जारी केलेल्या आदेशानुसार कामकाजाच्या सूचना दिल्या आहेत. कामकाजाच्या दिवशी वेळेवर कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही या आदेशाव्दारे दिले आहेत.