सुट्टीच्या दिवशीही मिनीमंत्रालयात कामकाज; सीईओंचा आदेश, मुख्यालयासह,पं.स मध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी

By जितेंद्र दखने | Published: December 16, 2023 06:52 PM2023-12-16T18:52:11+5:302023-12-16T18:52:22+5:30

शनिवारी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यामध्ये सुट्टीच्या दिवशीही काम सुरू असल्याचे चित्र १६ डिसेंबर रोजी दिसून आले.

Working in the Ministry even on holidays CEO's order, including headquarters, presence of employees in Pt | सुट्टीच्या दिवशीही मिनीमंत्रालयात कामकाज; सीईओंचा आदेश, मुख्यालयासह,पं.स मध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी

सुट्टीच्या दिवशीही मिनीमंत्रालयात कामकाज; सीईओंचा आदेश, मुख्यालयासह,पं.स मध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी

अमरावती : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.त्यामुळे विधानपरिषद, विधानसभा सदस्यांचे तारांकीत प्रश्न कपात सूचना, लक्षवधी उपस्थित केल्या जावू शकतात. त्यावर तत्पर कारवाई करण्यासाठी तसेच सुटयामुळे शासनाचे महत्वाचे अधिकारी सुध्दा जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता लक्षात घेता शनिवारी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यामध्ये सुटीच्या दिवशीही काम सुरू असल्याचे चित्र १६ डिसेंबर रोजी दिसून आले.

गेल्या ७ डिसेंबर पासून महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरू झाले आहेत.या अधिवेशनात विधानपरिषद, विधानसभा सदस्याव्दारा विविध विषयाचे अनुषंगाने तारांकीत प्रश्न,कपात सूचना, लक्षवेधी सूचना उपस्थित केल्या जावू शकतात. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषद,पंचायत समिती व अधिनस्त कार्यालयात याबाबत तत्पर कार्यवाही होऊन आवश्यक उत्तरे वेळीच सादर करणे आवश्यक आहे.याशिवाय अधिवेन काळात सुट्यामुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मुख्यकार्य अधिकारी अविश्यांत पंडा यांनी १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्यालयासह त्याअंतर्गत येणारी सर्व कार्यालये शनिवार १६ डिसेंबर या सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. सीईओच्या आदेशानसुार जिल्हा परिषद मुख्यालयातील बहूतांश विभागा सुरू होते.

Web Title: Working in the Ministry even on holidays CEO's order, including headquarters, presence of employees in Pt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.