‘इंटेरिओर हार्ड, सॉफ्ट स्कॅपिंग‘वर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:13 AM2021-09-25T04:13:07+5:302021-09-25T04:13:07+5:30
विद्यार्थ्यांना स्सर्गाशी व पर्यावरणाशी जवळीक साधता यावे, बागकामांची आवड निर्माण व्हावी, यातून रोजगाराची संधी शोधता यावी, या उद्देशाने हा ...
विद्यार्थ्यांना स्सर्गाशी व पर्यावरणाशी जवळीक साधता यावे, बागकामांची आवड निर्माण व्हावी, यातून रोजगाराची संधी शोधता यावी, या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत विद्यार्थ्यांच्या हितार्थ विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. इंटेरिओर हार्ड आणि सॉफ्ट स्कॅपिंग या कार्यशाळेत इंटेरियर डिझायनिंग, लँडस्केप डिझायनिंग या मनमोहक आणि नावीन्यपूर्ण विषयासाठी दोन दशकांचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या व्यवसायाने आर्किटेक्ट आणि कोल्हापूर गार्डन क्लबचे सचिव, पल्लवी कुलकर्णी यांनीपॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारा याविषयी माहिती दिली. द्वितीय सत्रात प्रात्यक्षिके दाखविली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी वनस्पतीशास्त्रचे विभागप्रमुख डॉ. पी.जी. बनसोड होते. कार्यशाळेकरिता प्राचार्य डॉ. प्रज्ञा येनकर, गार्डन क्लबचे अध्यक्ष दिनेश खेडकर, उपाध्यक्ष सुभाष भावे, सचिव रेखा मग्गीरवार, कोषाध्यक्ष शशांक देशमुख, पी.वी. पुलाटे, नम्रता काक्पुरे, पूजा सावरखेडे व सल्लागार समितीचे सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मोनाली घुरडे, आभार प्रदर्शन पी.वी पुलाटे यांनी केले. कार्यशाळेला ७० विद्यार्थी उपस्थित होते.