म्युकरमायकोसिसबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 05:00 AM2021-05-23T05:00:00+5:302021-05-23T05:00:58+5:30
म्युकरमायकोसिस साधारणत: रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कुठलेही लक्षणे आढळल्यास नाक-कान-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधणे व लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यात एमआरआय विथ कॉन्ट्रास्टची आवश्यकता असल्याचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. क्षितिज पाटील यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : म्युकरमायकोसिस व इतर आनुषंगिक विषयांबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत शनिवारी बचत भवन येथे कार्यशाळा घेण्यात आली.
म्युकरमायकोसिस साधारणत: रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कुठलेही लक्षणे आढळल्यास नाक-कान-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधणे व लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यात एमआरआय विथ कॉन्ट्रास्टची आवश्यकता असल्याचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. क्षितिज पाटील यांनी सांगितले.
औषधे आवश्यक असल्यासच द्यावी. अकारण चे औषध दिल्यास त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. शासनाच्या गाईड लाईननुसारच औषधोपचार केला पाहिजे, असे डॉ. प्रफुल्ल कडू म्हणाले.
याप्रसंगी ऑक्सिजन ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट त्वरीत करुन घेण्याचे सुचित केले. प्रत्येक हॉस्पिटलने रेट बोर्ड लावावा तसेच हॉस्पिटलची रिपोर्टिंग व सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना आयुक्त प्रशांत रोडे यांनी केल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे, डॉ. अजय डफळे, डॉ. विजय बख्तार, डॉ. विक्रांत राजुरकर, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. फिरोज खान, नोडल अधिकारी तसेच ईएनटी तज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
म्युकरमायकोसिस रुग्णांना प्राथमिकता द्या
म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांना प्राथमिकता देऊन त्यांची तपासणी व त्वरित औषधोपचार सुरू करावा. प्रत्येक रुग्णालयाने मागितलेली माहिती त्वरित देणे अपेक्षित आहे. औषधोपचाराची संपूर्ण माहिती तयार करुन ठेवावी. आवश्यक औषधींची नोंद झालीच पाहिजे. अनावश्यक औषध रुग्णांना देऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.