स्पेनच्या संत्रातज्ज्ञांच्या उपस्थितीत कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:15 PM2018-09-28T22:15:58+5:302018-09-28T22:16:14+5:30

महाआॅरेंज नागपूर व धनश्री अ‍ॅग्रो इंडस्ट्रज यांच्या विद्यमाने स्पेन येथील संत्रा विशेषज्ञ रॅमॉन नॉव्हियो यांच्या उपस्थितीत ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत कार्यशाळा आयोजित आहे. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाने केले आहे.

Workshop in the presence of Spanish astrologers | स्पेनच्या संत्रातज्ज्ञांच्या उपस्थितीत कार्यशाळा

स्पेनच्या संत्रातज्ज्ञांच्या उपस्थितीत कार्यशाळा

googlenewsNext
ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांना लाभ : महाआॅरेंजची उपलब्धी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाआॅरेंज नागपूर व धनश्री अ‍ॅग्रो इंडस्ट्रज यांच्या विद्यमाने स्पेन येथील संत्रा विशेषज्ञ रॅमॉन नॉव्हियो यांच्या उपस्थितीत ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत कार्यशाळा आयोजित आहे. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाने केले आहे.
काटोल तालुक्यातील हातला येथे जुनघरे यांचे बागेत ३० सप्टेंबरला, तर १ आॅक्टोबरला अमरावती जिल्ह्यातील प्रयोगशील संत्रा उत्पादक उद्धवराव फुटाणे यांच्या बागेत आणि २ आॅक्टोबरला श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात संत्रा उत्पादकांना कार्यशाळेत संत्रा बागायतदारांचे प्रश्न व त्यावरील शास्त्रीय उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशालेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे फलोद्यान विभागप्रमुख पंचभाई यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यशाळेचा संत्रा उत्पादकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक सुधीर जगताप व महेश दामोदरे यांनी केले आहे.

Web Title: Workshop in the presence of Spanish astrologers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.