स्मार्ट सिटीसंदर्भात आज कार्यशाळा
By admin | Published: November 5, 2015 12:17 AM2015-11-05T00:17:46+5:302015-11-05T00:17:46+5:30
महापालिकेच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्मार्ट सिटी अंतर्गत क्षेत्रविकास आराखडा या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती : महापालिकेच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्मार्ट सिटी अंतर्गत क्षेत्रविकास आराखडा या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन महापौर चरणजितकौर नंदा, पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ. श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समती सभापती विलास इंगोले यांच्या हस्ते करण्यात येईल.
ही कार्यशाळा नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, आर्किटेक्ट, अभियंते, जमीन विकासक, डॉक्टर्स, व्यापारीवर्ग, पत्रकार, शेतकरी, कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी इर्वीन हॉस्पीटल, वैद्यकीय अधिकारी डफरीन हॉस्पीटल, क्रीडा अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, सहा. संचालक नगररचना, महाराष्ट्र परिवहन मंडळ, भारतीय रेल्वे, विमान कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मेडिकल असोसिएशन, एनजीओ, आदींसाठी आयोजित करण्यात आली आहे.