३० वर्षांनंतर वऱ्हाडात जागतिक परिषद

By admin | Published: January 10, 2016 12:27 AM2016-01-10T00:27:46+5:302016-01-10T00:27:46+5:30

अंबानगरीत ३० वर्षांनंतर प्रथमच होत असलेल्या ४५ व्या आयएसटीई (इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन) व हव्याप्र ...

World Council in Varadhan after 30 years | ३० वर्षांनंतर वऱ्हाडात जागतिक परिषद

३० वर्षांनंतर वऱ्हाडात जागतिक परिषद

Next

हव्याप्र मंडळाचे आयोजन : ७५० इंजिनिअरिंग कॉलेजेस सहभागी
संदीप मानकर अमरावती
अंबानगरीत ३० वर्षांनंतर प्रथमच होत असलेल्या ४५ व्या आयएसटीई (इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन) व हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक परिषदेसाठी जगभरातील ७५० अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात ९ ते ११ जानेवारीदरम्यान 'चॅलेंजेस अँड अ‍ॅपॉच्युनिटी इन टेक्निकल एज्युकेशन इन द इरा आॅफ सस्टैनेबल डेव्हलपमेंट' अंतर्गत व कॉलेज आॅफ इंजिनिरिंग अँड टेक्नॉलॉजी एचव्हीपीएमतर्फे एक्सपेक्टेशन आॅफ स्टेट अँड सोसायटी आॅफ इंजिनिअरिंग एज्युकेशन' या विषयावर शनिवारी जगभरातून आलेल्या संशोधकांनी पेपर प्रेझेंटेशन केले. पहिल्या दिवशी ३५० संशोधकांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. 'द रोल अँड एक्सपेक्टेशन आॅफ इंडस्ट्री इन शेपींग इंजिनिअरिंग एज्युकेशन, स्पोर्ट्स अँड एंटरटेन्मेंट बिझनेस अ न्यू विस्टास फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन' या विषयावर या परिषदेत संशोधक आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रबाकरराव वैद्य उपस्थित होते. या परिषदेत विदेशातील बदलती शिक्षण प्रणाली भारतीय विद्यार्थ्यांना अवगत करता येणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

Web Title: World Council in Varadhan after 30 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.