अचलपुरातील शुभम पिहुलकरचा योगामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 09:42 PM2018-06-24T21:42:39+5:302018-06-24T21:42:59+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी राजस्थान येथील कोटा शहरात घेण्यात आलेल्या पद्मा बकासनामध्ये सर्वात अधिक वेळ थांबून अचलपुरातील शुभम संजय पिहुलकर याने गोल्डन बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावासह ऐतिहासिक अचलपूर शहराचे नाव नोंदविले आहे.
अमरावती - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी राजस्थान येथील कोटा शहरात घेण्यात आलेल्या पद्मा बकासनामध्ये सर्वात अधिक वेळ थांबून अचलपुरातील शुभम संजय पिहुलकर याने गोल्डन बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावासह ऐतिहासिक अचलपूर शहराचे नाव नोंदविले आहे.
अचलपुरातील लाइफ स्टाइल योगा क्लासेसचा योगपटू व कांडली येथे राहणाºया शुभमने प्रशिक्षक संतोष चंदेल यांच्याकडून प्रशिक्षण घेत राजस्थान येथील कोटा शहरामध्ये झालेल्या योगासनांच्या रेकॉर्डसाठी आपले नाव नोंदविले होते. देशभरातून चार ते पाच हजार योगपटूंनी या ठिकाणी सूर्यनमस्कार, जलयोग, कपालभाती, प्राणायाम, गर्भासन यांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी जवळपास १०१ वेगवेगळे विक्रम नोंदविले गेले. शुभमने पद्मा बकासनच्या स्थितीत तीन मिनिटांपर्यंत राहून गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट प्राप्त केले आहे.
शंभर साधारण योगासनांंपैकी एकाही योगप्रकारामध्ये सराव केल्यास, सहजच विश्वविक्रम बनू शकतो, असे शुभम याप्रसंगी म्हणाला.