२९ जुलै; जागतिक व्याघ्र दिन; जगात सर्वाधिक वाघ भारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 11:08 AM2021-07-28T11:08:21+5:302021-07-28T11:19:05+5:30

Amravati News जगातील एकूण वाघान पैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.

World Tiger Day; India has the most tigers in the world | २९ जुलै; जागतिक व्याघ्र दिन; जगात सर्वाधिक वाघ भारतात

२९ जुलै; जागतिक व्याघ्र दिन; जगात सर्वाधिक वाघ भारतात

googlenewsNext
ठळक मुद्देमेळघाट व्याघ्र प्रकल्प पहिल्या नऊ पैकी एकइंदिराजींची दूरदृष्टी


अनिल कडू

 लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : जगातील एकूण वाघान पैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.
         सन २००६ मध्ये देशात १४११ वाघ होते. सन २०१० मध्ये १७०० वाघ होते. टायगर एस्टिमेशन रिपोर्टनुसार सन २०१४ मध्ये भारतात २२२६ वाघ होते. त्यात लक्षणीय वाढ झाली असून. सन २०१८ मध्ये ही वाघांची संख्या २९६७ झाली आहे. जागतिक स्तरावर ही नोंद सर्वाधिक ठरली आहे.  

          तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७३ मध्ये सर्वप्रथम देशात व्याघ्र अभयारण्य ही संकल्पना अस्तित्वात आणली. देशात पहिले नऊ व्याघ्र अभयारण्य घोषित केले. यात मेळघाट व्याघ्र अभयारण्याचा समावेश केला गेला. राज्यातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प.वाघांच्या संरक्षण, संवर्धनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे योगदान देशपातळीवर उल्लेखनीय असून देशातील टॉप टेन मधील एक व्याघ्र प्रकल्प म्हणून मेळघाटची ओळख आहे. जागतिक व्याघ्र दिनी २९ जुलैला जागतिक स्तरावर देशासह या व्याघ्र प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केल्या जातो.


देशातील मोठा व्याघ्र प्रकल्प
     वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाच्या अनुषंगाने देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर असून ३६१.२८ चौरस किलोमीटर चे गुगामल राष्ट्रीय उद्यान त्यात समाविष्ट आहे.


 शंभर वाघांची क्षमता
         शंभरहून अधिक वाघांचा सांभाळ करण्याची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता आहे. एका वाघाला साधारणतः २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर आहेत. याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. वाघांचे छावे विचारात घेतल्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ७२ वाघ आज वास्तव्यास आहेत.


 क्राईम सायबर सेल
        मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वाइल्ड लाईफ क्राईम सायबर सेल सन २०१३ मध्ये स्थापन केल्या गेला. देशातील हा पहिला सायबर सेल. देशांतर्गत जवळपास अडीचशे शिकाऱ्यांना ,चोरट्यांना या सेलने पकडून दिले आहे. मागणीनुसार त्या त्या राज्याला हा सायबर सेल आपली सेवा देतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरट्या शिकाऱ्यांवर या सायबर सेलने आपला वचक निर्माण केला आहे.

Web Title: World Tiger Day; India has the most tigers in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ