जागतिक महिलादिनी रणरागिणी एकवटल्या
By Admin | Published: March 9, 2016 01:04 AM2016-03-09T01:04:08+5:302016-03-09T01:04:08+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या
दुचाकी रॅली : शहरवासीयांचे वेधले लक्ष
अमरावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीमुळे महिला शक्ती एकत्र आली होती. या रॅलीने दुचाकीवर फेटे घालून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
जागतिक महिला दिनाचे निमित्त पहिल्यांदाच महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस पुरस्कार, टीएचआर पाककृती स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, आदिवासी नृत्य, स्वर गुंजन आणि महिलांची वेशभूषा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांमुळे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या विविध उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील १४ अंगणवाडी प्रकल्पाच्यावतीने बालक आणि गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या माध्यमातून पाककृती स्पर्धेत विविध प्रकारची पाककृती साकारण्यात आली होती. याशिवाय पुष्प प्रदर्शनी, चिखलदरा तालुक्यातील मेमना येथील आदिवासी महिलांनी सादर केलेले गादली आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वृशाली विघे, सदस्या ममता भांबुरकर, संगीता सवई, रंजना उईके, संगीता चक्रे, मंदा गवई, वनमाला खडके, पंचायत समिती सभापती पद्मा इंगोले, शोभा इंगोले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी कै लाश घोडके आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आदर्श अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्काराने १५ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात आले. याशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील ज्या कर्मचाऱ्यांनी एक किंवा दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली, अशा कर्मचाऱ्यांचाही सन्मान पहिल्यांदाच करण्यात आला. यामध्ये एक अपत्य असलेल्या ८ आणि दोन अपत्य असलेल्या १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रास्ताविक डेप्युटी सीईओ कै लाश घोडके तर संचालन क्षीप्रा मानकर हिने केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका सहभागी होत्या.
आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्काराचे मानकरी
संगीता राजेंद्र तांबेकर, पुष्पा भीमराव तलवारे, समरता आत्माराम मेश्राम, फुलकईबाई पापाराव चौबे, रमा भीमराव सिरसाठ, मंदा पंजाबराव वानखडे, पंचफुला बळीराम चव्हाण, निलुनंदा दयाराम माहोरे, सुनिता मेश्राम, मांगुबाई मोतीलाल मावस्कर, वंदना किटुकले, संगीता विष्णु चौधरी, सुनीता जळमकर, तुळजा बाबाराव इंगळे, सुनीता नैथिले, बेबी श्रीराम देशमुख, सुनीता रामदास टोले, मालू स. देऊळकर, नलिनी हुड, बेबी राऊत, दर्शना मोहन धुमाळे, अर्चना मदन दुबे, अल्का देवीदास कंळबे, अरुणा प्रकाश फाटे, सुमन श्रीराम काकड, अर्चना भानुदास घाटे, अरुणा संजय चौधरी, संगीता विष्णू चौधरी, मंगला रामकृष्ण विधळे.
महिलांनी धरला ताल
जागतिक महिला दिनानिमित्त स्वर गुंजन कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित स्वर गुंजन कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि महिला कर्मचाऱ्यांनी मराठी गाण्यावर ताल धरत नाचण्याचा आनंदही व्दिगुणित केला.
दोन अपत्य असलेल्या कर्मचाऱ्यांचाही गौरव
श्रीमती आशा प्रफुल्ल ढोके, ज्योती संजयराव गावनडे, ज्योती दीपकराव मडावी, बाळासाहेब शामराव मोथरकर, ज्ञानेश्वर नामदेवराव सोनार, सुभाष मधुकरराव चव्हाण, राजेंद्र ल. बारड, दीपकराव मोरेश्वर डोंगरे, अविनाश विठ्ठलराव केदार, राजेंद्र द. माहुरे यांचा गौरव केला.
एक अपत्य असलेल्यांचा सन्मान
रावसाहेब चौधरी, गजानन रामराव कोकाटे, भावना राधाकिसन भिलावेकर, राजेश रामदास चौधरी, मनोहर शेषराव मंगळे, सुनिता माणिकराव ढवळे, रेखा ना. गवई, किशोर तुकाराम उडाखे यांचा समावेश आहे.