३५ लाखांच्या मका खरेदीवर पशुसंवर्धन समितीत घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:58 PM2018-08-24T21:58:13+5:302018-08-24T21:58:31+5:30
जिल्हा वार्षिक योजनेतून दृभत्या जनावरांना खाद्य पुरवठ्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांच्या मागणीपैकी ३५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद पशुसंर्वन विभागाने मंजूर केला आहे. यामधून मका व थोंबे खरेदी करून पुरवठा करणे आवश्यक होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्हा वार्षिक योजनेतून दृभत्या जनावरांना खाद्य पुरवठ्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांच्या मागणीपैकी ३५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद पशुसंर्वन विभागाने मंजूर केला आहे. यामधून मका व थोंबे खरेदी करून पुरवठा करणे आवश्यक होते. परंतु, पशुसंर्धन समितीच्या मान्यता न दिल्याने ३५ लाख रुपयांचा निधी पडून आहे. त्यामुळे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समिती सभेत सदस्य शरद मोहोड यांनी आक्रमक होत. सभपाती व प्रशासनाला जाब विचारला.
विविध विषयाला अनुसरून पशुसंवर्धन समितीची शुक्रवारी उपाध्यक्ष तथा समिती सभापती दत्ता ढोमणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. सभेच्या प्रारंभी सदस्य शरद मोहोड यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून पशुधन पालक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर मका व थोंबे (बहुवार्षिक गवत) पुरवठ्यासाठी डीपीसीने ३५ लाख रुपये उपलब्ध करून दिलेत. यामधून ३० लाख रुपयांचा मका व ५ लाख रूपयाच्या निधीतून थोंबे राष्ट्रीय बियाणे महामंडळ (महाबीज) किंवा एनएससी पूणे यांच्याकडून खरेदी करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार ही बाब पशुसंवर्धन विभागाने निदर्शनास आणून दिले. मग महाबीजकडून ही खरेदी का केली नाही, असा प्रश्न माहोड यांनी उपस्थित केला. यावर या बियाण्याचा दर्जा योग्य नसल्याचे मत सभापती ढोमणे यांनी व्यक्त केले. परंतु, याचे काही घेणेदेणे नाही. केवळ शेतकºयांना याचा लाभ व्हावा एवढीच आमची मागणी आहे. शेतकºयांकडून वैरणासाठी मका व थोंबे मागणी असूनही पुरविण्यात आली नसल्याने नाराजी पसरली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने हा पुरवठा होणे गरजेचे आहे. यावर निर्णय होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य चांगलेच संतापले होते.
अखेर सभापती दत्ता ढोमणे यांनी मका व थोंबे खरेदीला मंजुरी देण्याचा ठराव मांडला आणि तो सर्वानुमते पारित केला. त्यामुळे या विषयावर पडदा पडला. यावेळी सभेत इतरही विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सभेला समितीचे सदस्य सुखदेव पवार, दिनेश टेकाम, प्रियंका दाळू, सचिन पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.