सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे नसावा वाहतूक सुरक्षा सप्ताह

By admin | Published: January 17, 2016 12:04 AM2016-01-17T00:04:47+5:302016-01-17T00:04:47+5:30

दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे वा गणपती महाप्रसादाच्या कार्यक्रमाप्रमाणे वाहतूक सुरक्षा सप्ताह झाला आहे.

Like the worship of Satyanarayana, the Transportation Safety Week | सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे नसावा वाहतूक सुरक्षा सप्ताह

सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे नसावा वाहतूक सुरक्षा सप्ताह

Next

पालकमंत्र्यांनी उपटले कान : श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद
अमरावती : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे वा गणपती महाप्रसादाच्या कार्यक्रमाप्रमाणे वाहतूक सुरक्षा सप्ताह झाला आहे. या सप्ताहाचे स्वरुप तसे नसावे, अशा शब्दांत जिल्ह््याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शहर पोलिस दलाचे कान उपटले. मंचावर पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक हे उपस्थित होते, हे येथे उल्लेखनीय. ना.पोटे यांनी केलेल्या फटकेबाज भाषणाला श्रेत्यांची उत्स्फूर्त पसंती लाभली.
गाडी चार लाखांची असो वा चाळीस लाखांची, ती रस्त्याच्या मधोमध उभी करून गाडीमालक निघून जातात. पुढे अनेक तास त्या वाहनामुळे अडथळा निर्माण होत राहतो. वाहतुकीबाबत सामान्यांकडून जाणवणाऱ्या बेजबाबदारपणाचे पोटे यांनी सोदाहरण विश्लेषण केले. मोबाईलवर बोलत काही जण वर्दळीच्या रस्त्याने मधून वाहने हाकत असतात. मागून येणाऱ्या चारचाकी वानचालकाने हॉर्न वाजविल्यास पूर्ण शक्ती एकवटून तो मोबाईलवर बोलणारा वाहनचालक रागाने मागे वळून बघतो. जणू तो मागच्या वाहनचालकाला त्याच्या वागणुकीतून जाबच विचारत असतो. त्याच्या या कृतीतून त्याच्या अपघाताची भीती निर्माण होते. आजची पिढी ही अशी घडत आहे. किमान स्वत:पुरते जबाबदारीने वाहन चालविण्याचा संकल्प हे प्रकार रोखू शकतो.

उपाययोजनांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक
अमरावती : वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेक अपघात होत असतात. ते पुन्हा होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने उपाययोजना व्हायला हव्यात. पोलिसांसोबतच नगरसेवक, सामान्यजन, पत्रकार हे देखिल या मोहिमेत सहभागी होऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त करताना नेमके काय करावे, याबाबत त्यांनी 'अ‍ॅक्शन प्लन्ॉ'च सादर केला. ते म्हणाले, विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक आपल्याला रोज दिसतात. आपण सर्व एकच करूया. विरुद्ध दिशेने येणारा वाहनचालक दिसला की आपण त्याला रोखू. त्याला वाहतूक नियम पाळण्याचा आग्रह करून परत पाठवू. प्रत्येकाने किमान इतके केले तरी दखलनीयरित्या वाहतूक सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोटे यांनी सूूचविलेल्या या उपायाचे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
चित्र प्रदर्शनीच्या उदघाटन कार्यक्रमात महापौर रिना नंदा यांनी शहरातील अतिक्रमणाचा विळखा कमी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आपले जीवन वाचविण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला दिला. त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या समक्ष झालेल्या अपघाताचे उदाहरण देऊन मोबाईलवर बोलणे घातक असल्याचे समजावून सांगितले. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाची पार्श्वभुमीवर प्रकार टाकला. वाढती वाहने व वाढती लोकसंख्या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे सांगितले, तसेच वाहतूक परवाना घेताना नियमांचे समजावून न घेता, एजन्ट मार्फत घरबसल्या परवाने मिळविल्या जात आहे.
त्यामुळे नागरिक वाहतूक नियमाविषयी दक्षता घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुणे शहरात १५०० सिसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे, त्याचे नियंत्रण पोलीस नियंत्रण कक्षामार्फत केले जाते. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावतीमध्येही सिसीटीव्ही यंत्रणा बसविणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच नागरिक व पोलीस सन्मवय साधून त्यातून कायद्याचा धाक ठेवू असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक नितीन थोरात तर आभार पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी केले. यावेळी न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम, नितीन पवार, एसीपी चेतना तिडके, एम.एम.जोशी, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, निलीमा आरज, आदि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Like the worship of Satyanarayana, the Transportation Safety Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.