श्रीनिवास रेड्डी संदर्भात चांगले लिहून द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:36+5:302021-03-28T04:13:36+5:30

कॉमनसाठी परतवाडा : शुक्रवारी तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेले अमरावतीचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी हे ...

Write well in the context of Srinivas Reddy! | श्रीनिवास रेड्डी संदर्भात चांगले लिहून द्या!

श्रीनिवास रेड्डी संदर्भात चांगले लिहून द्या!

Next

कॉमनसाठी

परतवाडा : शुक्रवारी तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेले अमरावतीचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी हे चांगले अधिकारी होते. त्यांनी चांगल्याप्रकारे मेळघाटचा विकास केला. त्यांचे मोलाचे योगदान आहे. अशा प्रकारचे पत्र वनकर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांच्याकडून लिहून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यासंदर्भात कुणीही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्याविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपाली चव्हाण यांच्या परिवारासह समाज बांधव व न विभागातील अधिकारी कर्मचारी व विविध संघटनांनी केली होती. परिणामी, प्रशासनाच्यावतीने त्यांना तडकाफडकी नागपूर येथे पाठविण्यात आले. विनोद शिवकुमार याला पाठीशी घातल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर आहे.

बॉक्स

उपवनसंरक्षकाकडून दबावतंत्राचा वापर?

या पत्रासाठी काही उपवनसंरक्षकांकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती मिळताच संघटनांनी त्या उपवनसंरक्षकांनासुद्धा अशा कुठल्याच प्रकारे कृत्य न करण्याचे सुचविले आहे. असे झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने अपमानास्पद वागणूक देण्यासह एम. एस. रेड्डी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे कुठल्याच दबावाला बळी पडू नका तथा आपल्या एका बहिणीच्या मारेकऱ्यासाठी गद्दारी करू नका, असा मेसेज सोशल मीडियावर वनकर्मचाऱ्यांना पाठवून जनजागृती केली जात आहे.

कोट

रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली, अशा आशयाचे पत्र वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतले जात असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात काही उपवनसंरक्षकांशी आम्ही चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी निडर राहावे. दीपाली चव्हाण यांना न्याय द्यायचा आहे.

- प्रदीप बाळापुरे,

अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना

अमरावती

Web Title: Write well in the context of Srinivas Reddy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.