पोलीस शिपाई पदांची लेखी परीक्षा; निकाल सोमवारी घोषित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 12:26 PM2023-04-02T12:26:01+5:302023-04-02T12:32:45+5:30

शहर पोलिस आयुक्तालयासाठी एका ठिकाणी परीक्षा केद्रांचे नियोजन करण्यात आले होते.

Written Examination for Police Constable Posts; The result will be declared on Monday, amravati | पोलीस शिपाई पदांची लेखी परीक्षा; निकाल सोमवारी घोषित होणार

पोलीस शिपाई पदांची लेखी परीक्षा; निकाल सोमवारी घोषित होणार

googlenewsNext

- मनीष तसरे

अमरावती : शहर पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिसांतर्फे रविवारी सकाळी ८:३० ते १०:३० या वेळात पोलिस शिपाई या पदाकरीता लेखी परीक्षा घेण्यात आली. शहर पोलिस भरतीसाठी २० पदाकरीता २२२ उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले होते, तर ग्रामीण पोलिस भरतीसाठी १५६ पदाकरीता १८६३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले होते. या पात्र उमेदवाराच्या लेखी परीक्षेसाठी शहरात चार ठिकाणी परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आले होते. 

तसेच, शहर पोलिस आयुक्तालयासाठी एका ठिकाणी परीक्षा केद्रांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर उमेदवाराशिवाय कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परीक्षा केंद्रावर नेण्यास बंदी होती. यावेळी शहर पोलिसांतर्फे तपासणी करूनच त्यांना केंद्रावर जाऊ दिले. परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी ही परीक्षा इन कॅमेरा घेण्यात आली. ग्रामीण पोलिस शिपाई या पदांचा निकाल सोमवारी घोषित होणार आहे.

Web Title: Written Examination for Police Constable Posts; The result will be declared on Monday, amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.