यंदा १ लाख ३२ हजार मे. टन खतांची गरज

By admin | Published: May 3, 2016 12:18 AM2016-05-03T00:18:02+5:302016-05-03T00:18:02+5:30

यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. सर्वच विभागाद्वारा खरिपाचे नियोजन सुरू आहे.

This year, 1 lakh 32 thousand May Need of tons of fertilizers | यंदा १ लाख ३२ हजार मे. टन खतांची गरज

यंदा १ लाख ३२ हजार मे. टन खतांची गरज

Next

खरीप २०१६ : गतवर्षीचा ४०,२८५ मे. टन साठाही उपलब्ध
अमरावती : यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. सर्वच विभागाद्वारा खरिपाचे नियोजन सुरू आहे. खरिपासाठी बियाण्यासोबत रासायनिक खतांचीही वाढती मागणी आहे. यंदाच्या हंगामासाठी १ लाख ३२ हजार मे. टन खतांची गरज आहे. सर्वाधिक ३८ हजार ७०० मे टन संयुक्त खतांची मागणी आहे. तसेच गतवर्षीच्या ४० हजार २८५ मे. टन खतांचा साठादेखील यंदा उपलब्ध असल्यामुळे खतांची चणचण भासणार नाही.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ११ हजार ३५३ मे. टन खताचा वापर झाला होता. खरीप २०१६ मध्ये १ लाख ४३ हजार ५०० मे. टन खतांची मागणी होती. तसेच याच हंगामासाठी १ लाख ३२ हजार ००० यापैकी ३८ हजार ७३० मे. टन खते शिल्लक आहेत.
तसेच खरीप २०१६ मध्ये प्राप्त १ हजार ५५५ मे. टन खते प्राप्त झाले होते असा एकूण ४० हजार २८५ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ३७१ मे. टन युरिया, १० हजार ३६५ मे. टन एस. एस. पी., ६ हजार ८०८ मे. टन डी. ए. पी., २ हजार ८८२ एमओपी, १० हजार १९ मे. टन संयुक्त खते, ३ हजार ७८९ मिश्र खते व इतर असे ५१ मे. टन खते उपलब्ध आहे.
खरीप २०१६-१७ हंगामाकरिता अमरावती तालुक्यात १० हजार ५६० मे. टन ग्रेडनिहाय खते उपलब्ध आहे. भातकुली तालुक्यात ७ हजार २६० मे. टन, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५ हजार ९४० मे. टन, चांदूररेल्वे तालुक्यात ६ हजार ६०० मे. टन, धामणगाव तालुक्यात ८ हजार ५८० मे. टन, तिवसा तालुक्यात ९ हजार २४० मे. टन, मोर्शी तालुक्यात १३ हजार २०० मे. टन, वरूड तालुक्यात १५ हजार ८४० मे. टन, चांदूरबाजार तालुक्यात ९ हजार ९०० मे. टन, अचलपूर तालुक्यात १३ हजार ८६० मे. टन, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ११ हजार २२० मे. टन, दर्यापूर तालुक्यात ११ हजार ८८० मे. टन, धारणी तालुक्यात ६ हजार ६०० मे. टन व चिखलदरा तालुक्यात १ हजार ३२० मे. टन ग्रेडनिहाय रासायनिक खते मंजूर आहेत. (प्रतिनिधी)

संयुक्त खताला सर्वाधिक मागणी
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ३२ हजार ग्रेडनिहाय रासायनिक खते मंजूर आहेत. यामध्ये सर्वाधिक ३८ हजार ७०० मे. टन संयुक्त खताचा साठा मंजूर आहे. युरीया ३५ हजार ६०० मे. टन, डीएपी १८ हजार ६०० मे. टन, एमओपी ८ हजार ९०० व एसएसपी ३० हजार २०० मे. टन खतांचा साठा मंजूर आहे.
रबी २०१६ चा ३८,७३० मे. टन साठा शिल्लक
सद्यस्थितीत जिल्ह्यात गतवर्षीचा ३८ हजार ७३० मे. टन खतांचा साठा शिल्लक आहे. यामध्ये युरीया ५ हजार ८७१ मे. टन, एसएसपी ९ हजार ९१५ मे. टन, डिएपी ६ हजार ७५८ मे. टन एमओपी २ हजार ८०२ मे. टन, संयुक्त खते ९ हजार ५६९ मिश्र खते, ३ हजार ७६९ मे. टन व ईतर ४६ मे. टन खते शिल्लक आहेत.

Web Title: This year, 1 lakh 32 thousand May Need of tons of fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.