यंदा ९२९ ‘पीओएस’द्वारा खत विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:12 PM2018-05-16T22:12:59+5:302018-05-16T22:12:59+5:30
जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प राबविण्यात येत असल्याने ९२९ पीओएस (पॉइंट आॅफ सेल) मशीन वितरित करण्यात आल्यात. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी आता आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प राबविण्यात येत असल्याने ९२९ पीओएस (पॉइंट आॅफ सेल) मशीन वितरित करण्यात आल्यात. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी आता आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे.
आतापर्यंत खत उत्पादक कंपन्यांना निर्मितीनुसार अनुदान देण्यात येत होते. परंतु, आता जेवढ्या शेतकऱ्यांनी खताची खरेदी केली, तेवढेच अनुदान कंपन्यांना मिळणार आहे. यासाठीच्या नोंदी करण्यासाठी कृषिसेवा केंद्रांवर ९२९ पीओएस मशीन वितरित करण्यात आल्या. या मशीनचा वापर व प्रकल्पाच्या कार्यपद्धतीसाठी खतविक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. यंदाच्या हंगामातही याच प्रक्रियेने खतांची विक्री करण्यात येत आहे.
प्रकल्पासाठी जिल्ह्यातील अमरावती तालुक्यांमध्ये १०५, भातकुली ४०, नांदगाव खंडेश्वर ४२, चांदूर रेल्वे ३६, धामणगाव रेल्वे ६८, तिवसा ५०, मोर्शी ७८, वरूड ११७, चांदूरबाजार १०२, अचलपूर ९७, दर्यापूर ९०, अंजनगाव सुर्जी ७०, धारणी २७ व चिखलदरा तालुक्यात ७ पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले.
अशी आहे पीओएसची प्रक्रिया
शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक, त्यास आवश्यक खताचे वितरण या नोंदी खतविके्रत्याने मशीनवर नोंदवायच्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांना बोटाचा ठसा द्यायचा आहे. ही मशीन सिमकार्ड, इंंटरनेटद्वारे आधारशी लिंक असल्याने शेतकºयाची आधार ओळख पटल्यावर खतविक्री करता येईल.
अपवादात्मक स्थितीत पीओएस मशीन काम करीत नसल्यास मशीन सुरळीत होईपर्यंत विक्रेताने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नोंदवून घ्यायचे व मशीन सुरू झाल्यावर त्यामध्ये या क्रमांकाची नोंद घ्यायची आहे. खतविक्रीचे व्यवहार नगदी, उधारीने किंवा कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे.