यंदा कपाशीची चार लाख मेट्रिक टन उत्पादकता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:00 PM2018-02-07T22:00:47+5:302018-02-07T22:01:40+5:30
गुलाबी बोंडअळीच्या संकटाने जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्थ झाले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : गुलाबी बोंडअळीच्या संकटाने जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्थ झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने दुसरा प्राथमिक अंदाज जानेवारीअखेर अयुक्तालयास सादर केला. यामध्ये कापसाचे (रूई)े हेक्टरी ८४० किलो उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली, तर जिल्ह्यात एकूण ४.१३ मे.टन उत्पादन होणार असल्याचे वर्तविले आहे. कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे ५० टक्के उत्पादन कमी झाले.
खरीप हंगामात बीटी कपाशीवर आॅक्टोबरपासूनच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पंचनाम्यात ९६ टक्क्यांपर्यंत बोंडे किडल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाद्वारा जाहीर करण्यात येणारी दुसरा नजर अंदाज उत्पादकता अहवाल काय राहतो, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले होते.आता हेक्टरी ८४० किलो उत्पादन अपेक्षित असल्याचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकांना सादर झाला.
जिल्ह्यात यंदा दोन लाख ६ हजार ५०१ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. मात्र बीटीमध्ये बोंडअळीला प्रतिरोध करण्याची जीन्स् असताना बियाणे कंपन्यांनी दुय्यम दर्जाचे बियाणे विक्री केल्यामुळेच यापैकी दोन लाख हेक्टरमध्ये संकट ओढावले आहे. प्रयोगशाळेच्या परीक्षणाअंती पाच कंपनीच्या बियाण्यांमध्ये गुलाबी बोंडअळीला मारक क्षमता नसल्याचे सिद्ध झाल्याने शासनानेदेखील या कंपन्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याने शेतकऱ्यांच्या आरोपाला बळ मिळत आहे.