यंदाही आदर्श शिक्षक पुरस्काराचा मुहूर्त हूूूकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:27+5:302021-09-05T04:17:27+5:30
अमरावती: जिल्हा परिषद प्राथमिक शिषण विागाकडून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. त्यासाठी शिक्षकांचे ...
अमरावती: जिल्हा परिषद प्राथमिक शिषण विागाकडून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. त्यासाठी शिक्षकांचे प्रस्ताव मागविले जातात.मात्र कोरोनाच्या निर्बधामुळे तसचे अन्य प्रशासकीय अडचणीमुळे यंदादेखील शिक्षक दिन कार्यक्रम होणार शिक्षकांना पुरस्कारापासून वंचित राहावे लागत आहे.
दरवर्षी शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदे मार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ४८ शिक्षकांनी ऑनलाईन प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. यामध्ये १४ पंचायत समित्यांमधील प्रस्तावांचा समावेश आहे.प्राप्त प्रस्तावांची छाननी, निवड समितीसमोर मांडणी, प्रत्यक्ष मुलाखती व कागदपत्रांची तपासणी, गुणदानानुसार १४ प्राथमिक व एक माध्यमिक शिक्षकाची निवड यादी तयार करणे,त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या स्वाक्षरीने संपूर्ण प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मंजुरीला सादर करणे.त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीने याला मंजुरी देण्यात येते.या सर्व प्रक्रिया सुरू आहेत.मात्र या प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत.शिवाय कोरोना निर्बंधामुळे यंदाही ५ सप्टेंबरला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
बॉक्स
दोन वर्षातील पुरस्कार एकत्र होणार वितरण
गतवर्षाच्या जिल्हा पुरस्कार वितरणाला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अद्याप मुहूर्त मिळाला नाही. गतवर्षात १५ शिक्षकांची निवड झाली,परंतु शिक्षक पुरस्कारापासून वंचित आहे. यंदाही पुरस्काराची प्रक्रिया व कोरोनामुळे ५ सप्टेबरचा पुरस्कार वितरण होणार नाही .आगामी काही दिवसात दोन्ही वर्षातील पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.