शेंदूरजनाघाटच्या हळदीचा रंग फिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:38+5:302021-03-25T04:13:38+5:30

जयप्रकाश भोंडेकर शेंदूरजनाघाट : परिसरातील पारंपरिक पीक असलेल्या हळदीचा जोम आता ओसरला आहे. काढणीपश्चात प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जागेची अनुपलब्धता आणि ...

The yellow color of Shendoorjanaghat is pale | शेंदूरजनाघाटच्या हळदीचा रंग फिका

शेंदूरजनाघाटच्या हळदीचा रंग फिका

Next

जयप्रकाश भोंडेकर

शेंदूरजनाघाट : परिसरातील पारंपरिक पीक असलेल्या हळदीचा जोम आता ओसरला आहे. काढणीपश्चात प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जागेची अनुपलब्धता आणि उत्पादन खर्च-दरात न बसणारा ताळमेळ यामुळे या पिकाचे लागवडक्षेत्र घटले असून, शेंदूरजनाघाट परिसरात हळदीचा रंग फिका झाला आहे.

शेंदूरजनाघाट येथे हळदीचे पीक खोदून काढण्याचे काम सुरू आहे. ही खोदलेली हळद उकळून ती वाळवणे व वाळवून विक्रीकरिता तयार करणे सुरू आहे. या गावातील हळद उत्पादन आता सीमित झाले आहे. हळद पीक घेणारे शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून मृगाचा पावसाची वाट पाहत असतात. पाऊस कोसळला की, हळद पिकाची लागवड केली जाते. यात एरंडी, मिरची, भेंडी, टमाटर, वाल, काकडी आदी पिकेही घेतली जातात. गतवर्षी उत्पादकांनी विक्रीसाठी हळद तयार केली, परंतु व्यापारी दाखल न झाल्याने परिसरातच नगण्य दराने ती विकावी लागली. यंदाही कोरोनामुळे दरांबाबत अनिश्चितता व्यक्त होत आहे.

-------------

ओल्या हळदीची विक्री

हळदी पिकात नवीन वाण आल्याने शेंदूरजनाघाट परिसरातील हळदीची मागणी घटली. कमी दरामुळे हळद सुकविण्याऐवजी ओलीच विकण्यात आली, तर काही शेतकऱ्यांनी बेणे विकले.

----------

उकाडे झाले कमी

उत्पादन कमी होत असल्याने हळदीचे उकाडे बंद झाले. शेंदूरजनाघाट येथे दोन ठिकाणी उकाडे चालायचे. येथे मजुरांना कायम काम मिळायचे. आता शेतकरी शेतात हळदी उकळून वाळव------तात, तर काही बाॅयलर मशीनने हळदी उकळून वाळवत आहेत.

------------

हळदी लागवड प्रक्रिया

मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस आला की, जमीन सरी-कुदळीने उकरून तिथे हळदी बियाची लागवड केली जाते. लागवड करताना कुदळीचा वापर केला जातो.

----------

जमिनीतच लागते हळदीचे बी

एका वर्षी लावलेले हळदीचे बियाणे पुढील वर्षाला येत नाही, तर तिची टोळ तयार होते व जमिनीतच दुसरे बी तयार होते. ते हळद खोदताना वेगळे काढले, तर हळदी वेगळी करतात. काढलेले बी निसून जमिनीतच झाकून ठेवले जाते. पाऊस आला की, त्या सरीत लावल्या जातात.

--

फोटो -

बाॅयलर मशीन ने हळदी ऊकडने

ऊकडलेली हळदी वाळवने

Web Title: The yellow color of Shendoorjanaghat is pale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.