जंगलात बहरला पिवळा पळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:17 PM2018-02-21T23:17:30+5:302018-02-21T23:17:53+5:30
जिल्ह्यातील जंगलात पिवळा पळस बहरल्याने वनविभागासह निसर्गप्रेमींमध्ये आनंद संचारला आहे. आयुर्वेदिक औषधीयुक्त असलेला पळस अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडल्यामुळे लोप पावत आहे.
वैभव बाबरेकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यातील जंगलात पिवळा पळस बहरल्याने वनविभागासह निसर्गप्रेमींमध्ये आनंद संचारला आहे. आयुर्वेदिक औषधीयुक्त असलेला पळस अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडल्यामुळे लोप पावत आहे.
वनविभागाचे वनरक्षक अमोल गावनेर यांना जंगलात पिवळ्या फुलाचे पळसवृक्ष बहरलेले आढळले. यापूर्वी सन २०१३ मध्ये पिवळ्या फुलाच्या पळसाची वर्धा जिल्ह्यात नोंद झाल्याची माहिती वन्यप्रेंमी देत आहे. रंगपंचमीच्या पर्वावर नैसर्गिक रंग म्हणून पळसांच्या फुलांचा उपयोग होतो. जंगलात बहुंताश पळसाच्या वृक्ष लाल रंगाच्या फुलांनी बहरले असून जंगलात एकच पिवळ्या रंगाचे हे एकमेव पळस वृक्ष आकर्षण ठरत आहे. पळसांची लाल रंगाची फुले सर्वाधिक आढळतात. यात पिवळा, पांढरा, लाल, केसरी फुलांचे पळसाचे वृक्ष आहेत. अल्बिनिझमचा प्रकार असून यामध्ये वनस्पतीतील रंगद्रव्यात बदल होतो. पांढºया व पिवळ्या रंगांच्या पळसांच्या फुल धनप्राप्ती होते ही अंधश्रद्धा आहे. या झाडाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे एक आयुर्वेदिक औषध आहे. हे वृक्ष जगंलात असल्याने त्याला वन विभागाचे सरंक्षण मिळाले आहे.
नैसर्गिक रंगाने होळी साजरी करा
होळीपूर्वी पळस वृक्ष फुलांनी बहरतात. पूर्वी याच नैसर्गिक रंगाने रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र आता कृत्रिम रंगांच्या वापर वाढल्याने त्वचेचे विकार वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक रंगानेच रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन वन्यजीवप्रेमी नीलेश कंचनपुरे यांनी केले आहे.
पिवळ्या रंगाची फुले असणारे पळसाचे वृक्ष वनरक्षकांना आढळले आहे. वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे त्या वृक्षाला जंगलात सरंक्षण देण्यात आले आहे.
- प्रवीण चव्हाण,
मुख्य वनसरंक्षक (प्रादेशिक)