श्री गणेशदास राठी विद्यालयात योगाभ्यासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:12+5:302021-06-30T04:09:12+5:30

------------- आतेबहिणीला माहेरी सोडून दुसरा संसार थाटला चांदूर रेल्वे : दिघी कोल्हे येथील सोमेश्वर सुभाष मेश्राम याने पत्नी असलेल्या ...

Yoga lessons at Shri Ganeshdas Rathi Vidyalaya | श्री गणेशदास राठी विद्यालयात योगाभ्यासाचे धडे

श्री गणेशदास राठी विद्यालयात योगाभ्यासाचे धडे

Next

-------------

आतेबहिणीला माहेरी सोडून दुसरा संसार थाटला

चांदूर रेल्वे : दिघी कोल्हे येथील सोमेश्वर सुभाष मेश्राम याने पत्नी असलेल्या आतेबहिणीला एक वर्षापासून माहेरी सोडले आणि दुसरे लग्न केले. त्याविषयी जाब विचारण्याकरिता गेलेल्या पत्नीसोबत गेलेल्या सूरज अर्जुन खंगार (२८, रा. सातेफळ) या नातेवाइकाला काठीने जखमी करण्यात आले. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी सोमेश्वर तसेच सुभाष मेश्राम, देवेंद्र सुभाष मेश्राम व एका महिलेविरुद्ध 26 जून रोजी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

------------------------

वहिवाटीचा रस्ता अडविला

तळेगाव दशासर : दानापूर शिवारातील अशोक मोहोळ (६४, रा. मांजरखेड दानापूर) यांच्या शेताचा रस्ता अडवून तेथून ट्रॅक्टर जाऊ दिला नाही व जातिवाचक शिवीगाळ केली. २१ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी २७ जून रोजी राजू अंगदराव ढगे (५५), महेश राजू ढगे (२८), गजानन वामनराव सहारे (३०), अरुण चिंधुजी ठाकरे (५०), भाऊराव श्यामराव मांगुळकर (४५,सर्व रा. दानापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

दत्तापूर पोलिसांनी पकडली अवैध रेती

धामणगाव रेल्वे : दत्तापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्तीदरम्यान भिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर अवैध रेती वाहून नेणारा ट्रक पकडला. त्यामध्ये १८ हजारांची तीन ब्रास रेती होती. एमएच ३१ एपी ७०३४ क्रमांकाच्या या ट्रकचा चालक दिनेश गजानन भगत (२६, रा. दाभाडा) व मालकाविरुद्ध २७ जून रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

---------------

राजुरा येथे युवकाला काठीने मारहाण

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील राजुरा येथे नीलेश दारोडकार (३२) हा बहिणीचा फोन आल्याने सूरज शेंडेच्या घरापुढील ओट्यावर बसून बोलत होता. यावेळी सूरज तेथे आला आणि तू येथे का बसला, असे म्हणून काठीने डोक्यावर मारले. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी २७ जून रोजी सूरजविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Yoga lessons at Shri Ganeshdas Rathi Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.