आधी तुझं माझं जमेना; अन् आता तुझ्यावाचून करमेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:30+5:302021-09-25T04:12:30+5:30

असाईनमेंट अमरावती: व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेमप्रकरणे व अनैतिक संबंध ...

You don't have mine before; And don't do it without you now! | आधी तुझं माझं जमेना; अन् आता तुझ्यावाचून करमेना !

आधी तुझं माझं जमेना; अन् आता तुझ्यावाचून करमेना !

googlenewsNext

असाईनमेंट

अमरावती: व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेमप्रकरणे व अनैतिक संबंध यातून पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. ती प्रकरणे महिला समुपदेशन कक्षाकडे पोहोचलेत. अनेकांच्या समुपदेशन करण्यात आले. त्यातून सुमारे २७७ प्रकरणात समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आले.

सन २०२१ च्या जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत शहर आयुक्तालयातील पोलिसांच्या भरोसा सेलकडे एकूण ५१७ तक्रारी आल्या आहेत. त्यातील २७७ पती-पत्नीचा वाद भरोसा सेलने मिटविला. त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला. पती-पत्नीच्या वादाचे महत्त्वाचे कारण मोबाइल होते. नोकरी गेली म्हणून पतीची असलेली व्यसनाधीनता, पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणार संशय हा घराची शांती भंग करण्यास कारणीभूत होत असतो.

///////////////

५१७ आठ महिन्यात भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारी

२७७ प्रकरणात घडवून आणला समेट

//////////////

बायको वारंवार माहेरी जाते म्हणूनही वाद

महिला किंवा पुरुषांकडून मोबाइलचा अतिवापर किंवा सोशल मीडियाचा अत्याधिक वापर ही सर्व कारणे पत्नी-पत्नीच्या संसाराला ग्रहण लागत आहेत. सोबतच बायको वारंवार माहेरी जाते म्हणूनही वाद होतात.

त्यातून परिस्थिती हाताबाहेर जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जात आहे.

/////////////////

मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर

पती नोकरीवर जायचा, मुले शाळेत जायची, यामुळे घरात एकटी राहून काम आटोपल्यानंतर टीव्ही व मोबाइल वापरून आपली टाइमपास करणाऱ्या महिलांना मोबाइलचा नाद लागला. कोरोनामुळे पती घरात असल्यावरही त्यांच्या हातून मोबाइल सुटत नसल्यामुळे यातून पती-पत्नीत वाद झाला.

///////////

पोलीस आयुक्तांचा पुढाकार

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे पुरुषवर्ग घरी बसला. तासन्तास घरीच घालवू लागल्याने काही दिवसांतच ते पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊ लागले. अशा नानाविध कारणांमुळे झालेले कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यात येतात. मात्र, आमचा भर समुपदेशन व समेट घडवून आणण्याकडेच असतो. त्यातून या आठ महिन्यात २७७ संसार नव्याने फुलविण्यात यश आले.

डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त

//////////

Web Title: You don't have mine before; And don't do it without you now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.