भंगार वाहनांतून करावा लागतो प्रवास, सांगू कोणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:00 AM2021-11-29T05:00:00+5:302021-11-29T05:00:56+5:30

आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात.

You have to travel in scrap vehicles, tell me who? | भंगार वाहनांतून करावा लागतो प्रवास, सांगू कोणाला ?

भंगार वाहनांतून करावा लागतो प्रवास, सांगू कोणाला ?

googlenewsNext

संदीप मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ज्या वाहनांना १० ते १५ वर्षे पूर्ण झाले. त्यानंतर आरटीओकडून वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन नोंदणी करणे अनिवार्य असते. मात्र, आता नोंदणी नसलेल्या अनेक वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे दुर्दैवाने अपघात झालाच, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंगार वाहनांतून जीवघेणा प्रवास सुरू असला तरी सांगू कुणाला, असा सवाल प्रवाशांचा आहे.
आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात. तरीही प्रवासी वाहने विनाफिटनेस, विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओने अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहेत. एसटीचा पूर्णपणे संप अद्यापही मिटला नाही.  त्यामुळे नागरिकांची गोची होत असून, खासगी प्रवासी वाहनांशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. 
स्थानिक मध्यवर्ती आगार परिसरातून तसेच पंचवटी चाैकातून खासगी प्रवासी वाहने सुसाट धावतात. यात अनेक भंगार वाहनांचाही समावेश असतो. अशा वाहनांवर नियमाने कारवाई व्हायला हवी. 

या वाहनांशिवाय पर्याय नाही
बस बंद असल्यामुळे नागपूरला जायचे असल्यास लक्झरी बस तसेच परतवाडा, दर्यापूर, चांदूररेल्वे, मोर्शी व इतर तालुक्यात जाण्यासाठी काळी पिवळी, स्कूल बस तसेच इतर अनेक खासगी वाहने धावत आहेत. प्रवासी अधिक असल्याने भंगार वाहनेही रस्त्यावर काढली आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी नाही, अशा नागरिकांना खासगी प्रवासी वाहनाशिवाय पर्याय नाही.

दीडपट भाडे देऊनही जिवाला धोका
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सर्व खासगी वाहने रस्त्यावर उतरली असून प्रवासी भाडे घेत आहे. बस बंद असल्याचा फायदा घेत भाडे दीडपट ते दुप्पट केले आहे. असे असतानाही अनेक भंगार अवस्थेत असलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले. वाहनाचे आयुष्य संपल्यानंतरही आरटीकडे नोंदणी नूतनीकरण न करता वाहने धावत असल्याने कारवाईची अपेक्षा आहे.

नियमानुसर ज्या प्रवासी वाहनांचे आयुष्य ८ वर्षापेक्षा जास्त झाले आहे. अश्या वाहनांना दरवर्षी फिटनेस करून पासिंग करुन घ्यावी लागते. विना पुर्ननोंदणी न करता वाहने धावत असतील तर अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. तशी वर्षभरही कारवाई करण्यासंदर्भातील मोहिम सुरुच असते. मोटर वाहन चालकांना आदेशित करून पुन्हा मोहिम राबविण्यात येईल.
-रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

 

Web Title: You have to travel in scrap vehicles, tell me who?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.