तुम्ही वाहनाचे कर्ज फेडले; एनओसी कोण घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:09 IST2024-12-24T12:07:19+5:302024-12-24T12:09:14+5:30
Amravati : कागदपत्रावरील कर्जाचा बोजा कमी करणे आवश्यक

You paid off your vehicle loan; who will take the NOC?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहन कर्जावर घेतले असल्यास ते कर्ज परतफेड केल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेऊन वाहनाच्या कागदपत्रावरील कर्जाचा बोजा कमी करणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात शेकडो वाहनधारकांनी कर्ज फेडूनही त्यांच्या नावावर बोजा नोंद असल्याचे चित्र आहे. अनेकजण वाहन खरेदी करण्यासाठी वाहन कर्ज घेतात. वाहन खरेदीसाठी अनेक वित्तीय कंपन्याही सवलतीच्या दरात व्याज देतात. बेसिक कार, प्रीमियम आणि लक्झरी कारही कर्जामुळे घेणे शक्य होते. दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे मुदतीचा कर्जाचा कालावधी आहे. मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित वाहनावरील कर्जाचा बोजा कमी केला जात आहे. ज्या वाहनावर कर्जाचा बोजा आहे, अशा वाहनाचे हस्तांतरण करण्यासाठी अथवा वाहनावरील तारणबोजा उतरवण्यासाठी वित्तदात्याची एनओसी आवश्यक असते.
कर्जाची परतफेड केल्यानंतर काय कराल..?
आरटीओकडे जमा करा. वाहन कर्ज पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. न झाल्यास वाहन विक्री आणि वाहन चोरीला गेल्यास अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी योग्य वेळी दक्षता घेणे गरजेचे आहे.
कर्जाची परतफेड करताना ही काळजी घ्या?
आरटीओकडे जमा करा
एचपी रिमूव्हल म्हणजे तुमच्या आर. सी. बुकवरून तुमच्या बँकेचा तपशील काढून टाकावा लागतो. हे काम पूर्ण न केल्यास आरटीओत तुमच्या नावावर कारची नोंद होणार नाही.
बँकेकडून एनओसी घ्या...
कर्ज संपल्यानंतर बँकांकडून एनओसी घेऊन आरटीओत प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहन कर्ज फेडल्यानंतर आणि बँकेकडून एनओसी घेतल्यानंतर आरटीओतून एचपी करणे आवश्यक
गाडीवरील कर्जाचा भार कमी करा.
कर्जाचा भार कमी केल्याशिवाय वाहनांचे हस्तांतरण होत नाही. विक्री करता येत नाही.
कर्ज फेडूनही अनेक गाड्यांचा कागदपत्रावर भार
बँकेकडून घेतलेली एनओसीची मुदत ही तीन महिन्यांसाठी असते. ही मिळाल्यानंतर आरटीओ कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तीन महिन्यांत 'एनओसी' जमा केली नसल्यास ती पुन्हा काढावी लागते, त्यासाठी सध्या काही बँकांनी 'एनओसी'चे दरही वाढवले आहेत.
"मोटार वाहन कायद्यानुसार ज्या वाहनावर कर्जाचा बोजा आहे, अशा वाहनाचे हस्तांतरण करण्यासाठी अथवा वाहनावरील तारणबोजा उतरवण्यासाठी वित्तदात्याची एनओसी आवश्यक असते."
- प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती