अमरावती जिल्ह्यात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 07:34 PM2020-05-25T19:34:35+5:302020-05-25T19:35:57+5:30

शेतीचे नुकसान झाले आहे, असे फोनद्वारे भावाला कळवून ३७ वर्षीय शेतकऱ्याने अमरावती जिल्ह्यात पिंपळविहीर शिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन रविवारी दुपारी आत्महत्या केली.

Young farmer commits suicide by hanging in Amravati district | अमरावती जिल्ह्यात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती जिल्ह्यात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देपिंपळविहीर शिवारातील घटनाशेतीचे नुकसान झाल्याचे कळविले


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतीचे नुकसान झाले आहे, असे फोनद्वारे भावाला कळवून ३७ वर्षीय शेतकऱ्याने पिंपळविहीर शिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन रविवारी दुपारी आत्महत्या केली. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
गिरीधर काशीनाथ नारिंंगे (३७, रा. शिवणगाव, नांदगावपेठ) असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात मृताचे ज्येष्ठ बंधू दिलीप काशीनाथ नारिंगे (४१, रा. शिवणगाव) यांनी पोलिसांत फिर्याद नोंदविली. आपल्या शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आता जगण्यात काही अर्थ नाही, असे मृत्यूपूर्वी गिरीधरने सांगितले व फोन कट केला, असे नमूद आहे. पुढील तपास पोलीस जमादार प्रमोद खरबडे करीत आहेत.

Web Title: Young farmer commits suicide by hanging in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.