युवा शेतकऱ्याने जपली परंपरा, वऱ्हाडी बैलगाडीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:09 AM2018-05-04T01:09:05+5:302018-05-04T01:09:05+5:30

तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतकऱ्याने ती जपत आपल्याकडील वऱ्हाडी १५ बैलगाड्यांतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले.

The young farmer's tradition of tradition, from the Varhadi bullock cart | युवा शेतकऱ्याने जपली परंपरा, वऱ्हाडी बैलगाडीतून

युवा शेतकऱ्याने जपली परंपरा, वऱ्हाडी बैलगाडीतून

googlenewsNext
ठळक मुद्देदहा किलोमीटरचा केला प्रवास

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतकऱ्यांने ती जपत आपल्याकडील वऱ्हाडी १५ बैलगाड्यांतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले.
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील हाडाचे शेतकरी असलेले हरिभाऊ इंगोले यांचा मोठा मुलगा रूपेश यांचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथील नानाजी वानखडे यांच्या उच्चशिक्षित शीतल या मुलीशी बुधवारी नायगाव येथे लखाजी महाराज देवस्थान सभागृहात पार पडला. घरी सर्व संपन्नता असतानाही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने गावातील बैलबंडीने वऱ्हाडी लग्नमंडपी नेण्याचे त्याने ठरविले. नवरदेवासह वऱ्हाडी विवाह सोहळ्यासाठी बैलगाडीने गेल्याने या विषयाची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात रंगत आहे.
जवळपास १५ बैलगाड्यांनी वऱ्हाडी निघाले. पारंपरिक पायजना व शर्ट परिधान केलेल्या नवरदेवाकरिता सजविलेल्या दमणीचा धुरकरी हा टाय-कोटमध्ये ‘अप टू डेट’ होता. या दमणीला उंचपाठी पंढरपुरी बैलजोडी जुंपली होती. पाठीवर चमकदार झूल आणि रंगवलेल्या शिंगांवर देवांच्या तसबिरी असलेले वाशिंड होते. गावात अनेक वर्षांनतर पहिल्यांदाच बैलजोडीने नवरदेव निघत असल्याने आबालवृद्ध हरखले होते.
मंगरूळ दस्तगीर ते नायगाव असा प्रवास करून लग्नकार्य उरकल्यानंतर नवरदेव-नवरी पुन्हा याच बैलगाड्यांनी घरी परतले.
शेतकऱ्यांना कितीही जिवावर येत असले तरी बैलजोडीचे महत्त्व अबाधित आहे. आजच्या तरुणांना हे दाखविण्यासाठी तसेच आपल्या परंपरा जतन करण्यासाठी हे पाऊल उचलले.
- रूपेश इंगोले, नवरदेव

Web Title: The young farmer's tradition of tradition, from the Varhadi bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न