युवा साहित्यिकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:03 PM2018-01-14T23:03:29+5:302018-01-14T23:04:29+5:30
येथील जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयात उभारलेल्या स्व. बाळासाहेब तेलखेडे साहित्य नगरीत दुसरे युवा साहित्य संमेलन शुक्रवारी कला व साहित्य विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
आॅनलाईन लोकमत
दर्यापूर : येथील जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयात उभारलेल्या स्व. बाळासाहेब तेलखेडे साहित्य नगरीत दुसरे युवा साहित्य संमेलन शुक्रवारी कला व साहित्य विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. नव्या उमेदीच्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे या हेतून साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
संत गाडगेबाबा मंडळ दर्यापूर आणि अकोला येथील सृष्टी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा साहित्यिक किशोर बळी होते. उद्घाटन प्रसिद्ध हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले. यावेळी गझलनवाज भीमराव पांचाळे, शास्त्रीय युवा गायिका भाग्यश्री पांचाळे, व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख, प्राचार्य रामेश्वर भिसे, संतोष हुशे, पप्पू मोरवाल, ईश्वर मते, पंकज कांबळे, अभिजित नागले, दीपाली बळी, वनिता गावंडे, मनोहर घुगे उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशवराव गावंडे यांनी जबाबदारी सांभाळली. संचालन अरविंद शिंगाडे, दीपिका सोनार, अक्षय राऊत, तर आभार गोपाल मापारी यांनी मानले. यावेळी स्व. केतन पिंपळापुरे प्रवेशद्वार आणि स्व. हिंमत शेकोकार ग्रंथदालन तसेच स्व. त्र्यंबकराव गणेशपुरे सभामंडप उभारून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी प्राची मेंढे, दीप्ती वानखडे, विश्वजित गुडधे, अश्विनी कोल्हे, सागर देशमुख, चंद्रशेखर तरारे, यशश्री काशीकर, नीळकंठ महल्ल, युवराज ठाकरे, राघवेंद्र गणेशपुरे व शुभांगी माहुरे या प्रतिभावंत युवा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दीपिका सोनार यांची चित्रप्रदर्शनी, गोपाल खाडे यांची गणेशचित्रप्रदर्शनी हे संमेलनाचे आकर्षण ठरले. श्रोत्यांची गर्दी उसळली होती.