आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 06:27 PM2019-03-21T18:27:30+5:302019-03-21T18:28:26+5:30
रंगपंचमीची रंग खेळून आष्टा परिसरातील वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी एका 18 वर्षीय आदिवासी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रंगपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजता घडली.
मोहन राऊत
रंगपंचमीची रंग खेळून आष्टा परिसरातील वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी एका 18 वर्षीय आदिवासी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रंगपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजता घडली.
विशाल गणेश उईके असे मृतक युवकाचे नाव असून नदीत पोहण्यात वाचलेल्या युवकांचे नाव राहुल गजानन चव्हाण वय (25) ,ऋषिकेश अशोक मोहिजे (20), गुड्डू गजानन गेडाम (22), सुरज दिवाकर पंधरे (24), आकाश रामदास पवार (26) अशी या घटनेतून सुखरूप वाचलेल्या युवकांची नावं आहेत.
तालुक्यातील निंबोली भोंगे येथील हे सहा युवक रंगपंचमी खेळून दुपारी बारा वाजता आठ किलोमीटर अंतराववर असलेल्या नजीकच्या आष्टा गावाजवळ वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. सर्व सहा ही युवक या नदीत पोहण्यासाठी नदीत उतरले विशाल याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो काही अंतरावर पोहण्यासाठी गेला मात्र काही वेळाने त्याच्या किंकाळ्या ऐकू आल्या त्यामुळे नदीत असलेल्या पाच युवकाने आरडा ओरड सुरू केली बाजूच्या परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी या युवकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला परंतु तोपर्यंत विशाल याचा मृत्यू झाला होता. वाहत्या पाण्यात त्याचा मृतदेह वाहून गेला या घटनेची माहिती मंगरूळ दस्तगीर येथील पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळावर धाव घेतली. त्यानंतर मृत युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
आई मी आंघोळ करून परत येतो
वडीलांचा सात वर्षापूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर विशाल याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती एक बहीण लग्नाची आहे आई मी आंघोळ करून आष्टा येथून परत येतो असे आपल्या आईला सांगून विशाल हा वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेला होता त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच वृद्ध आईने हंबरडा फोडला असल्याची माहिती पोलीस पाटील विवेक वैरागडे यानी दिली मंगरूळ दस्तगीर येथील ठाणेदार सतीश आडे पोलीस उपनीक्षक ठावरे देवेन्द्र नस्करी निस्ताने या घटनेचे अधिक तपास करीत आहे