धाकट्याने दिले मोठ्या भावाला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:14 PM2018-09-25T22:14:44+5:302018-09-25T22:15:07+5:30
धाकट्याने मोठ्या भावाला किडनी देऊन जीवनदान दिले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धाकट्याने मोठ्या भावाला किडनी देऊन जीवनदान दिले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
योगेश गोकुल आहाके (३६) हे सहा महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त होते. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक टी.बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात नेफ्रोलॉजिस्ट अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार सुरू होता. डॉक्टरांनी किडनी दान करण्यासंदर्भात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी होकार दर्शविला. धाकटा संदीप गोकुल आहाके याने किडणी दान करण्याची तयारी दाखविली. यवतमाळ येथील राज्य प्राधिकार समिती तसेच अधिष्ठाता मनीष श्रीगीरीवार, समिती अध्यक्षा स्नेहल कुळकर्णी, आरोग्य उपसंचालक आर.एस. फारुखी यांच्या समितीने किडनी प्रत्यारोपणाला मान्यता दिली. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. त्यासाठी नागपूर येथील युरोलॉजिस्ट संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ भाऊ राजूरकर यांची विशेष उपस्थिती होती. सुपर स्पेशालिटीतील युरोसर्जन राहुल पोटोडे, विक्रम देशमुख, विशाल बाहेकर, राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट अविनाश चौधरी, विक्रम कोकाटे, सौरभ लांडे, बधिरीकरण तज्ज्ञ राजेश कस्तुरे, रामप्रसाद चव्हाण, प्रणित घोनमोडे तसेच कर्मचारी प्रतिभा अंबाडकर, निता श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडीले, ज्योती काळे, रितू बैस यांनी शस्त्रक्रियेदरम्यान कामकाज पाहिले.
प्रत्यारोपणसंबंधी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी समन्वयक सोनाली चौधरी, समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर यांचा वाटा होता. यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमधील डॉ. मीनल चव्हाण व प्रकाश येणकर यांचे सहकार्य लाभले.
यापूर्वी ४ एप्रिल व ९ जून रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती.