टँकरमधील डांबर उसळून भाजला युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:56 PM2019-03-13T22:56:03+5:302019-03-13T22:56:51+5:30

शहरात वाहनांच्या वर्दळीत काय घडेल, याचा नेमच राहिला नाही. टँकरमधील गरम डांबराचे शितोंडे उडल्याने एक मोपेड चालक गंभीररीत्या भाजला गेला, तर तिघांचे काळ्या डागांवरच निभावले. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास राजापेठच्या नवीन उड्डाणपुलासमोरील गुलशन मार्केटपुढील रस्त्याच्या उंचवट्यावर घडली.

The young man in the tanker jumped from the tanker | टँकरमधील डांबर उसळून भाजला युवक

टँकरमधील डांबर उसळून भाजला युवक

Next
ठळक मुद्देगुलशन मार्केटसमोरील घटना : तिघे किरकोळ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, समज देऊन सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात वाहनांच्या वर्दळीत काय घडेल, याचा नेमच राहिला नाही. टँकरमधील गरम डांबराचे शितोंडे उडल्याने एक मोपेड चालक गंभीररीत्या भाजला गेला, तर तिघांचे काळ्या डागांवरच निभावले. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास राजापेठच्या नवीन उड्डाणपुलासमोरील गुलशन मार्केटपुढील रस्त्याच्या उंचवट्यावर घडली.
संतोष मिठुजी सुजाने (३०, रा. गोपालनगर) असे भाजल्या गेलेल्या युवकाचे नाव आहे. नवाथेनगर स्थित एका व्यापारी संकुलात असलेल्या जाधव सोलर अँड आॅटोमोटिव्ह प्रा.लि.मध्ये व्यवस्थापक पदावर ते कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळी ते अंबापेठ स्थित एका चार्टर्ड अकाऊंटंटकडे कामानिमित्त गेले होते. तेथून ते त्याच्या इलेक्ट्रिक मोपेडने राजापेठकडून नवाथेनगर येथे आपल्या कंपनी कार्यालयात जात होते. राजापेठ येथील उड्डाणपुलावरून गुलशन मार्केटपुढे ते आले. त्यावेळी डांबरने भरलेला एमएच १८ ए ००५३ क्रमांकाचा टँकर मागेच होता.
दरम्यान, टँकर मोपेडला ओव्हरटेक करून गुलशन मार्केटच्या उंचवट्यावर आला. यावेळी अचानक टँकरने उसळी घेतल्याने त्यामधील तप्त डांबर हेलाकाले आणि त्याचे मोठ्या प्रमाणात शिंतोडे डाव्या बाजूने असलेल्या संतोष सुजाने यांच्या अंगावर उडाले. संतोष सुजाने यांनी त्यांचे वाहन थांबविले आणि चालकाला आवाज देऊन टँकर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकर चालक तेथून पुढे निघून गेला. अपघातात डांबर अंगावर पडल्याने संतोष यांचा चेहरा, हात भाजला गेला. याशिवाय त्यांच्या दुचाकीवरही डांबर उडाले. त्यांनी तत्काळ आपल्या मित्रांना घटनेची माहिती देऊन टँकरचालकाला रोखून धरण्यास सांगितले. त्यांच्या मित्रांनी नवाथेनगर चौकात टँकर थांबविला. संतोष सुजानेंवर गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मालकावर गुन्हा का नाही?
डांबराची वाहतूक करताना ते सुरक्षितरीत्या नेण्याची जबाबदारी टँकर चालक व मालकाची आहे. या घटनेत याबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. टँकरचे झाकण उघडे वा अर्धवट लावल्यानेच हा अपघात घडला, हे नक्की. यामध्ये टँकरमालकही दोषी आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे.
तिघे बचावले
डांबरचा टँकर रोडवरील उंचवटा चढत असताना हेलकावला आणि टँकरमधील उष्ण डांबराचे शिंतोडे सर्वाधिक संतोष सुजाने यांच्या अंगावर उडाले. याशिवाय त्या मार्गाने जात असलेल्या अन्य तीन वाहनचालकांच्या कपड्यांवरसुद्धा डांबर उडाले. संतोष सुजाने गंभीररीत्या भाजले गेले, तर अन्य तीन वाहनचालक सुखरूप बचावले. त्यांच्या कपड्यावर डांबर उडाले असून, तेसुद्धा किरकोळ भाजले गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी यासंदर्भात तक्रार केली नाही.

संतोष सुजाने यांच्या तक्रारीवरून चालक संतोष विष्णू सखे (४५, रा. धामोरी, ह.मु. सातुर्णा परिसर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ.

डांबराचे शिंतोडे चेहरा व हातावर पडल्याने तरुण भाजला गेला. त्याच्यावर उपचार सुरु केले असून, प्रकृती चांगली आहे. डांबर लागल्याने त्वचा डॅमेज झाली आहे.
- नरेंद्र वानखडे,
बर्न सर्जन, गेट लाइफ हॉस्पिटल.

Web Title: The young man in the tanker jumped from the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.