कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमानचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:48 PM2019-01-30T22:48:36+5:302019-01-30T22:49:11+5:30

अचलपूर जिल्हा निर्मिती व शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पक्षाने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार नवनीत राणा यांनी चांदूर बाजार येथे व्यक्त केला. महिला मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले.

Young Swabhiman Elgar for Debt Waiver | कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमानचा एल्गार

कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमानचा एल्गार

Next
ठळक मुद्देनवनीत राणा : चांदूर बाजार तालुक्यात महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर जिल्हा निर्मिती व शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पक्षाने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार नवनीत राणा यांनी चांदूर बाजार येथे व्यक्त केला. महिला मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले.
चांदूर बाजारातील संगेकर सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला महिलांचा जनसागर उसळला होता. यावेळी चांदूर बाजार तालुक्याच्या विकासावर नवनीत राणा यांनी भर दिला. अस्मानी व सुल्तानी संकटांचा सातत्याने सामना करावा लागत असल्याने शेतकरी पूर्णपणे कर्जामध्ये बुडला आहे. दरदिवशी शेतकरी आत्महत्या होतच आहेत. त्यामुळे शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊन कर्जाच्या जोखडातून एकदाचा मोकळा करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा युवा नवनीत राणा यांनी दिला. अमरावती जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी होण्यासाठीसुद्धा प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी नगरसेविका वैशाली खोडापे, उषा माकोडे, महिला व बाल कल्याण सभापती कविता अकोलकर, बांधकाम सभापती मीरा खडसे, नगरसेविका फातिमा बानो, अर्चना रायकर, वैशाली मलावे, मनीषा नागलिया, अर्चना कराळे, नीतू रघुंवशी, शारदा चर्जन, श्वेता बैस, अनुराधा पवार, राधिका तिरमारे, शुभांगी कुलाटे, सुवर्णा साबळे, जया सावरकर, सुमती ढोके, जिल्हा परिषक सदस्या मयुरी कावरे, नगरसेविका ज्योती किटके, मोहिते, मीना आगासे, चंदा लांडे, सुनीता सावरकर, प्रियंका भुजाडणे, माला खुरसुळे, प्रतिभा महाजन, वैशाली गुलाबसे आदी उपस्थित होत्या.

Web Title: Young Swabhiman Elgar for Debt Waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.