अंजनगाव बारी येथील युवकाने धनादेश केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:49+5:302021-02-06T04:22:49+5:30

अंजनगाव बारी : येथील एका नवयुवकाला ५० हजार रुपये नमूद असलेला धनादेश आढळला. तो त्याने संबंधिताला परत करण्यासाठी स्थानिक ...

A youth from Anjangaon Bari returned the check | अंजनगाव बारी येथील युवकाने धनादेश केला परत

अंजनगाव बारी येथील युवकाने धनादेश केला परत

googlenewsNext

अंजनगाव बारी : येथील एका नवयुवकाला ५० हजार रुपये नमूद असलेला धनादेश आढळला. तो त्याने संबंधिताला परत करण्यासाठी स्थानिक पत्रकारांकडे सुपुर्द केला. बबन जगन्नाथ निगोते (३२) असे त्या तरूणाचे नाव. ३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळी निगोते हा अमरावतीला गेला असता, त्याला उमेश माणिकराव बनसोड, ५, छत्रीतलाव रोड, राजश्री कॉलनी, अमरावती या खातेधारकाचा ५०,००० रुपये रकमेचा धनादेश सापडला. त्याने तो धनादेश येथील पत्रकार साहेबराव राऊत, गजेंद्र ढवळे व पवन इंगोलेंकडे सुपूर्द केला. याबद्दल ग्रामस्थांनी त्याचे कौतुक केले.

-----------------------------

शेंदूरजनाघाट येथे शोभायात्रा

शेंदूरजनाघाट : राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन महाअभियानानिमित्ताने शेंदूरजनाघाट येथे शोभायात्रा काढण्यात आली. स्थानिक श्रीराम व्यायामशाळा आखाडा येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. शेंदूरजनाघाट शहरातील मुख्य मार्गाने ही शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत माजी मंत्री अनिल बोंडे, नगराध्यक्ष रुपेश मांडवे, उपाध्यक्ष सुभाष गोरडे, नगसेवक विशाल सावरकर, जयप्रकाश भोंडेकर, धनराज अकर्ते, गजानन कपले, मंदा वसुले, सारिका बेलसरे, रेखा अढाऊ, नीलिमा कांडलकर, ओमप्रकाश कांडलकर, नीलिमा कुबडे, माजीे नगराध्यक्ष प्रशांत सावरकर, सरिता खेरडे, प्रवल खसारे, राम सेलवट, प्रदीप तिवारी, सुनील होले, तुषार अकर्ते, श्री राम उत्सव समितीचे पदाधिकारी, तथा ग्रामस्थ सहभागी झाले होते.

-----------------------

धामणगावात विज बिलाची होळी

धामणगाव रेल्वे : कोरोना काळात सर्वसामान्य माणसांना वीज बिलात सूट देणार असल्याचे प्रथम राज्य शासनाने घोषित केले. मात्र आता वाढीव वीजबिल देऊन वसुलीसाठी नोटीस पाठवत असल्याने शुक्रवारी भाजपच्यावतीने आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत वीजबिलांची होळी करून वीज मंडळासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. वीज मंडळाचे उपविभागीय अभियंता यु. के. राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर, सरचिटणीस नितीन मेंढुले, सुनील साकुरे, उषा तिनखेडे, दिपाली मानकर, राजेंद्र पोपळघाटे, अनुराग मुडे, सुनील जावरकर, हेमकरण कांकरिया,बंडू पाटील, विनोद धुवे, मंगेश मारोडकर, गजानन रोंघे, नलिनी मेश्राम, सीमा देवतडे, विद्या राऊत, निवृत्ती लोखंडे, चेतन कट्यारमल, वैभव देशमुख आदी उपस्थित होते.

------------

Web Title: A youth from Anjangaon Bari returned the check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.