मृत अजगरासोबत फोटोसेशन करणाऱ्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:26 AM2017-11-21T00:26:16+5:302017-11-21T00:27:52+5:30

मृत अजगारासोबत फोटोसेशन करणे एका तरुणास चांगलेच महागात पडले.

The youth arrested for the photo snake with dead snake were arrested | मृत अजगरासोबत फोटोसेशन करणाऱ्या तरुणास अटक

मृत अजगरासोबत फोटोसेशन करणाऱ्या तरुणास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देफेसबूकवर फोटो व्हायरल करणे पडले महागात : वनविभागाची धडाकेबाज कारवाई

आॅनलाईन लोकमत
अमरावती : मृत अजगारासोबत फोटोसेशन करणे एका तरुणास चांगलेच महागात पडले. वनविभागाने फेसबूकवर फोटो व्हायरल करणाऱ्या राहुल रावसाहेब काळे (१९, रा.वझरखेड) या तरुणाला रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अटक केली. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याच्या प्रतिक्रिया वन्यप्रेमी संघटनांमध्ये उमटत आहे.
राहुल काळे याने मृत अजगरासोबतच फोटोसेशन करून ते फोटो फेसबूकवर व्हायरल केल्याची माहिती वन्यप्रेमी संघटनेने वनविभागाला दिली. त्या माहितीच्या आधारे तत्काळ वनविभागाचे फिरते पथक घटनास्थळी रवाना झाले. उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्या मार्गदर्शनात पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी एम.व्ही. धंदरसह वनरक्षक अमोल गावनेर, सतीश उमक, नवेद काजी यांनी वलगाव पोलीस ठाण्यामागे असणाऱ्यां वराडे घाट या घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी अजगराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
मारेकऱ्यांचा शोध सुरू
वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला. असता अजगरची लांबी सात फूट, तर जाडी ३० सेमी. असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाने पशुवैद्यकीय अधिकामार्फत अजगाराचे शवविच्छेदन केले.
वनविभागाने फोटो व्हायरल करणाºया राहुल काळेच्या वझरखेड येथील घरी धाड टाकली. तो पळून जाण्याच्या बेतात होता. वनकर्मचाºयांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची वनकर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, अजगराला गावातील काही व्यक्तीने मारल्याचे त्याने सांगितले. आता राहुलच्या माहितीच्या आधारे वनकर्मचारी अजगराला मारणाऱ्यांचा शोध घेत आहे. याप्रकरणात वनविभागाने राहुल काळेविरुद्ध भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या ९, ३९, (१) अ, ५०, ५१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. वन्यजीव संवर्धनाच्या विषयात हयगय केली जात नसल्याचे यानिमित्त दिसून आले आहे.
तीन वर्षे शिक्षेची तरतूद
भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार अजगराला मारणे गुन्हा ठरतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला तीन वर्षांपर्यंतची शिक्षा, २५ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
तीन दिवसांची वनकोठडी
मृत अजगरासोबत फोटो व्हायरल करणाऱ्या राहुल काळेला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या चौकशीसाठी वनविभागाने सात दिवसांच्या वनकोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी मंजूर केली.
कार्स संस्थेतर्फे मिनांचा सत्कार
सापाला मारण्याच्या घटनांमध्ये आजपर्यंत वनविभागाने तडकाफडकी कारवाई केलेली नाही. कार्स संस्थेच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या माहितीवर उपवनसरंक्षक हेमंत मिणा यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणात गतिमान कारवाई केली. वनविभागाने दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक वन्यप्रेमी करीत आहेत. यासंदर्भात कार्सचे चेतन भारती व शुभम गिरी यांनी हेमंत मिणा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मृत अजगाराचे फोटो फेसबूकवर व्हायरल करणाºया एका तरुणास ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.
- हेमंत मिणा, उपवनसंरक्षक, अमरावती वनविभाग.

Web Title: The youth arrested for the photo snake with dead snake were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.