गाणू लेआऊटनजीकच्या खुल्या जागेत तरुणांचा दारूचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:08+5:302021-04-19T04:12:08+5:30
अमरावती: एमआयडीसी जुन्या बायपास मार्गावरील नागरिकांची वस्ती असणाऱ्या गाणू लेऑऊट परिसर काही टवाळखोर तरुणांनी सायंकाळच्या वेळीस मद्यप्राशन करण्याचा ...
अमरावती: एमआयडीसी जुन्या बायपास मार्गावरील नागरिकांची वस्ती असणाऱ्या गाणू लेऑऊट परिसर काही टवाळखोर तरुणांनी सायंकाळच्या वेळीस मद्यप्राशन करण्याचा अड्डा बनविला आहे.
याच ठिकाण गांजा सुद्धा ओढला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील पुष्पश्री अपार्टमेंटजवळील निर्जनस्थळी तरुणांसह अल्पवयीन मुले सुध्दा बिनधास्तपणे दारू, बिअर व गांजाचे सेवन करीत असल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले आहे. या प्रकरणी या भागातील पोलिसानी सुद्धा दुर्लक्ष केले असून नागरिकांची कारवाईंची मागणी केली आहे. गाणू लेऑऊटच्या परिसरात प्रतिष्ठीत नागरिक वास्तव्याला आहेत. या ठिकाणी खुल्या भागात अद्यापपर्यंत घरे न झाल्यामुळे येथे झाडेझुडुपे वाढलेली आहे. त्याचा फायदा घेऊन येथे तरुण दारू व गांजा पितात. येथे बिअर व दारूच्या बॉटलचा खच पडलेला दिसला.
यामुळे तरुण व्यसनाधीनतेकडे जात असून काही व्यसनी तरुणांनी या परिसराला दारू व गांजा सेवनाचा अड्डाच बनविला आहे. अल्पवयीन मुले बिअरच्या बॉटल हातात घेऊन एक-एक घोट घेत मौजमस्ती करताना दिसतात.
बॉक्स
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
तरुण व अल्पवयीन दररोज आपआपल्या दुचाकीने या निर्जनस्थळी येऊन दारू व गांजा पीत आहे. हे मद्यपी तरुण नशेमध्ये जोरजोरात ओरडणे व शिविगाळ करत असून, दारू व गांजाच्या नशेत हे तरुण गुन्हे करण्याची शक्यता नाकरता येत नाही. सायंकाळच्या वेळेत दारू व गांजा पीत बसणाऱ्या या तरुणांची टवाळखोरी पाहून तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन कोट आहेत.