वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाच्या मुद्यावर युवक काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:45 AM2019-08-28T01:45:51+5:302019-08-28T01:46:20+5:30
धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, टिंटबा, बिजुधावडी, बैरागड, चटवाबोड, रंगुबेली, चाकर्दा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. परिणामी आदिवासी रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील आदिवासी रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इतरही आरोग्याच्या प्रश्नांवर मंगळवारी युवक काँग्रेसने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, टिंटबा, बिजुधावडी, बैरागड, चटवाबोड, रंगुबेली, चाकर्दा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. परिणामी आदिवासी रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे भरण्यात यावी तसेच बंद असलेल्या रुग्णवाहिका तातडीने सुरू कराव्यात, आदी मागण्या निवेदनाव्दारे युवक काँग्रेसने केल्या. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्यावतीने देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव सागर देशमुख, जिल्हाध्यक्ष पकंज मोरे, राहुल येवले, समीर जवंजाळ, रवि रायबोले, सागर कलाने, निलेश गुहे, रोहित देशमुख, गुड्डू हमीद, प्रथमेश गवई, मुकेश लालवाणी, अनिकेत जावरकर व पदाधिकारी सहभागी झाले होते.