युवक काँग्रेसचे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:27 PM2018-10-11T21:27:30+5:302018-10-11T21:27:43+5:30
मागील काही दिवसापांसून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने गुरुवारी आंदोलन छेडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील काही दिवसापांसून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने गुरुवारी आंदोलन छेडले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेपुढे निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करून इंधन, गॅस सिलिंंडर व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ कमी करण्याची मागणी केली.
मागील काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. मध्यंतरी इंधनाचे दर कमी करण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु, याचा काहीच फायदा सामान्यांना झालेला नाही. त्यामुळे भाजप सरकारच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करीत युवक काँग्रेसने आंदोलन करून याकडे सरकारचे लक्ष वेधले.
आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर देशमुख, उपाध्यक्ष परिक्षित जगताप, रवि रायबोले, सागर कलाने, सागर यादव, रोहित देशमुख, नितीन ठाकरे, मो. दानिश, अमित गुळधे, सुमीत खराते, सूरज अडायके, तन्मय मोहोड व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.