जिल्हा परिषदेत युवक कॉग्रेसचा ठिय्या
By admin | Published: May 4, 2016 12:37 AM2016-05-04T00:37:09+5:302016-05-04T00:37:09+5:30
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत पूरहानी कार्यक्रम (एफडीआऱ) अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील चुनखडी ते खडीमल रत्याच्या कामात अनियमिता करण्यात आली आहे.
आंदोलन : निकृ ष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत पूरहानी कार्यक्रम (एफडीआऱ) अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील चुनखडी ते खडीमल रत्याच्या कामात अनियमिता करण्यात आली आहे. तर चुर्णी येथे तंटामुक्त पुरस्काराचे रक्कमेतही अनियमितता असल्याने या दोन्ही प्रकणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी मंगळवारी जिल्हा युवक कॉग्रेसच्यावतीने करित जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले.
चुनखडी फाटा ते खडीमल आणि खडीमल ते माडीझडप रस्ता एफडीआर मंजूर करण्यात आला.यामध्ये सिमेंट रस्ता, व सुरक्षा भितींच्या कामांचा समावेश आहे. या कामाकरिता सुमारे ४० आणि ३५ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली. सदर काम निकृष्ट दर्जाचे आहे. यासाठी ठरवून दिलेले आवश्यक साहित्य सुध्दा वापरण्यात आले नाही. त्यामुळे या कामात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप युवक कॉग्रेसने केला आहे. चुर्णी गावाला शासनाकडून सन २०१३-१४ मध्ये सुमारे ५ लक्ष रूपयांचा तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला . मात्र ही रक्कम संबंधित ग्रामसेवकाने ग्रामसभेला व जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता परस्परच अनावश्यक कामावर खर्ची घातली आहे. याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिले. सदरचे निवेदन कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ यांनी स्विकारले. आंदोलनात भैय्या पवार, राहूल येवले, विक्रम ठाकरे, गुडू धर्माळे, आदित्य पेलागडे, अमोल बोरकर, गुडू हमीद, फिरोज भाई, सुनील कासदेकर, गुडू धोटे, सचिन वाकोडे व अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)