विकासासाठी वरुड येथे युवक काँग्रेसचे धरणे
By admin | Published: June 19, 2016 12:03 AM2016-06-19T00:03:28+5:302016-06-19T00:03:28+5:30
स्थानिक नगरपरिषद हद्दीत विविध समस्यांनी घर केले असून समस्या तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्यावतीने स्थानिक महात्मा फुले चौकात
प्रशासनाविरोधात नारेबाजी : प्रचंड संताप
वरुड : स्थानिक नगरपरिषद हद्दीत विविध समस्यांनी घर केले असून समस्या तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्यावतीने स्थानिक महात्मा फुले चौकात युवक काँग्रेसच्यावतीने वर्धा लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नगरपरिषद हद्दीत विविध समस्या असताना मुख्याधिकारी अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. त्यामळे नगरपरिषद बेवारस झाली असून नागरिकांची कामे खोळंबतात. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने व्यवस्था करावी, केदार चौकातील भाजीवाले, फळविक्रेते तसेच किरकोळ व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देणे, चुडामण नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्यात आली. परंंतु ही स्वच्छता अविरत सुरू ठेवण्याकरिता पथक नेमावे, गुल्हाणे वाडी वॉर्ड क्र २२ मध्ये रस्त्याचे काम प्रशासकीय मान्यतेनुसारच करावे, मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकरिता कारवाई करावी, मुलताई चौक ते सानेगुरुजी कॉलनीपर्यंत पथदिवे लावण्यात यावे, क्राँकीट रस्त्याचे काम भ्रष्टाचारमुक्त करण्यात यावे, घरोघरी शौचालय आणि घरकुलाचे धनादेशाचे वाटप करण्यात यावे, शहरात वृक्षारोपण करून सौंदर्यात भर घालावी, कचराकुंड्या, पथदिव्यांची शहरातील काही भागांत व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध मागण्यांकरिता तालुका व शहर युवक काँग्रेसच्यावतीने जि.प. सदस्य विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाणे, नरेंद्र चोरे, उमाशंकर देशमुख, सुधाकर बंदे, मीना बंदे, किशोर काळे, अनिल सुपले, नरेंद्र पावडे, नीलेश बेलसरे, जयंत काशीकर, प्रवीण चौधरी, प्रमोद टाकरखेडे, लोकेश अग्रवाल, धनंजय बोकडे आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)