युवा शेतकºयाने घेतले विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:02 PM2017-10-02T23:02:42+5:302017-10-02T23:03:07+5:30
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर खासगी कंपनीत २५ वर्षे नोकरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुºहा : अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर खासगी कंपनीत २५ वर्षे नोकरी केली. दीड लाख रुपये महिन्याचा पगार सोडून शेती करण्यासाठी आलेल्या एका युवकाने पारंपरिक शेती करणाºया शेतकºयांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
तिवसा तालुक्यातील कुºहा येथील शेतकरी संजय देशमुख यांनी कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता संपूर्णत: नैसर्गिकरीत्या डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले.
संजय देशमुख यांनी २०१४ साली तीन एकर जागेत दोन हजार डाळिंबाची लागवड केली. शंभर टक्के विषमुक्त डाळिंब उत्पादित करायचे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आॅगस्ट २०१७ मध्ये त्यांनी पहिला बार तोडला. त्यात ९ टन उत्पादन घेतले.
कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता त्यांनी लावलेल्या झाडांवर ३०० ते ४०० ग्रॅमपर्यंतचे एक-एक डाळिंब लागले आहे. यासाठी त्यांनी विविध शेतकरी तज्ज्ञांकडून वेळोवेळी सल्ले घेतले. नाशिक येथील डाळिंब उत्पादक व अभ्यासक बाळासाहेब म्हैसकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
त्यांची पुढची वाटचाल या परिसरातील तरुण मेहनती शेतकºयांना एकत्र करून विषमुक्त संत्रा, भाजीपाला, आणि शक्य होईल तेवढ्या शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्यास मार्गदर्शन करणार आहेत.
परदेशात फळांची मागणी
विषमुक्त डाळिंबास युरोपात सर्वाधिक मागणी आहे. यामुळे त्यांनी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली. यात त्यांना पूर्णपणे यश मिळाले असून पहिल्याच बहरात त्यांना संपूर्ण विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन घेता आले आहे. विशेष म्हणजे त्यांची डाळिंबाची बाग विदर्भातील पहिली सेंद्रिय व विषमुक्त फळबाग आहे. युरोपियन युनियनच्या निकषावर त्यांच्या बागेतील फळे विषमुक्त ठरली आहेत.
पारंपरिक शेती सोडून सेंद्रिय शेती ही काळाची गरज झाली आहे. विषमुक्त धान्य, फळे भाजीपाला पिकविण्याला प्राधान्य देण्यासाठी शेतकºयांसह शासनानेदेखील पुढाकार घेतला पाहिजे. सेंद्रिय शेतीसाठी विदर्भातील शेतकºयांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
- संजय देशमुख,
विषमुक्त डाळिंब उत्पादक